ETV Bharat / sports

ऑलराऊंडर केदार जाधवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर - Kedar Jadhav Retirement - KEDAR JADHAV RETIREMENT

Kedar Jadhav Retirement : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केदार जाधवनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2020 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

Kedar Jadhav Retirement
Kedar Jadhav Retirement (ians photos)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 7:57 PM IST

Kedar Jadhav Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा स्टार खेळाडू केदार जाधवनं वयाच्या 39 व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केलाय. गेल्या काही दिवसांत क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा दिनेश कार्तिकनंतर तो दुसरा भारतीय यष्टीरक्षक खेळाडू आहे. केदार जाधवनं महेंद्रसिंह धोनी प्रमाणे इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्ती जाहीर केलीय.

धोनीच्या शैलीत घेतली निवृत्ती : इंस्टाग्राम पोस्टमध्ये केदार जाधवनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या पार्श्वभूमीवर 'जिंदगी के सफर में...' हे गाणं वाजत आहे. केदार जाधवनं महेंद्रसिंह धोनी प्रमाणं निवृत्ती जाहीर केलीय. महेंद्रसिंह धोनीनं देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्याच्या कारकिर्दीतील फोटो शेअर करत, 'मै पल दो पल का शायर हूं' हे गाणं त्यासोबत लावलं होतं. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण : केदार जाधवनं 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 82 सामने खेळले असून 1511 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 7 अर्धशतकं आणि 2 शतकं ठोकलीत. केदार जाधव भारतीय संघासाठी 73 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामध्ये त्यानं 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा ठोकल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 120 आहे. केदार जाधवनं त्याच्या एकदिवसीय सामन्याच्या कारकिर्दीत 27 बळी घेतले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 2015 साली पदार्पण केलं होतं. केदार जाधव फक्त 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आणि 20.33च्या सरासरीनं 122 धावा केल्या आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी : महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्सकडून खेळणाऱ्या जाधवनं सीएसके, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), कोची केरळ टस्कर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या पाच इंडियन प्रीमियर फ्रँचायझींसाठी 93 सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जाधवनं एकूण 87 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 17 शतके आणि 23 अर्धशतकांच्या मदतीनं 6,100 धावा केल्या आहेत. 39 वर्षीय जाधवच्या नावावर प्रथम श्रेणीतील त्रिशतक (327 धावा) आहे, जे त्यानं 2012 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध केलंय. 2013-14 हंगामात त्यानं विक्रमी 1,223 धावा केल्या.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.