कानपूर Kanpur Test Day 3 Called off : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही पावसामुळं वाया गेला. आऊटफील्ड ओलं असल्यानं तिसऱ्या दिवशी सामना सुरु होऊ शकला नाही. मैदानावर सूर्यप्रकाश पडला नाही, परंतु पाऊसही पडला नाही. विकेटच्या आजूबाजूचा भाग चांगला दिसत होता, पण आऊटफिल्डच्या काही भागात, जिथं थोडं पाणी साचलं होतं, ते भाग अधिक महत्त्वाचे होते. आता सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळ होणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.
UPDATE 🚨
— BCCI (@BCCI) September 29, 2024
Play for Day 3 in Kanpur has been called off due to wet outfield.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HPPxBMhY87
कानपूर कसोटी अनिर्णित होण्याच्या मार्गावर : प्रेस एंड ते मिडऑफ या भागात मैदान कोरडं करण्याचं काम सुरु होतं. पंचांनी क्युरेटरच्या उपस्थितीत मैदानाचं निरीक्षण केलं आणि त्यांना वाटलं की खेळ सुरु करण्यासाठी परिस्थिती फारशी योग्य नाही. त्यामुळं कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करावा लागला. तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यामुळं आता कानपूर कसोटी अनिर्णित होण्याच्या मार्गावर आहे.
कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताचं किती नुकसान : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी अनिर्णित राहू शकते. कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं. कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यानं भारताला बांगलादेशसोबत गुण शेअर करावे लागणार आहेत. या स्थितीत भारत आणि बांगलादेशला 4-4 गुण सामायिक करावे लागतील. भारतानं कानपूर कसोटी जिंकल्यास त्यांचे 12 गुण होतील. म्हणजेच कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास भारताला 8 गुणांचं नुकसान सहन करावं लागेल.
हेही वाचा :
- भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडला धक्का, कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून 'क्लीन स्वीप'; 15 वर्षांनंतर 'असं' घडलं - SL Beat NZ in 2nd Test
- ...तर खेळाडूवर लागणार 2 वर्ष बंदी; BCCI नं घेतला सर्वात मोठा निर्णय - Player Ban in IPL
- कानपूर कसोटी: तिसऱ्या दिवशीही पाऊस मांडणार खेळ, आज मॅच होणार की नाही? कसं असेल हवामान; वाचा सविस्तर - Kanpur Weather Day 3