ॲडिलेड Australia New Captain : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी खेळला गेला, ज्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 2 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्सनं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चमत्कारिक कामगिरी करत आपल्या संघाला रोमहर्षक पद्धतीनं विजय मिळवून दिला होता. (New Captain of Australia Team)
Introducing Australia's newest white-ball captain! #AUSvPAK
— cricket.com.au (@cricketcomau) November 6, 2024
Details on the squad changes: https://t.co/3jLCAZbdDZ pic.twitter.com/jL2zNoF98r
पॅट कमिन्सची शानदार कामगिरी : पॅट कमिन्सनं गोलंदाजीत 9.4 षटकांत 39 धावा दिल्या यात 1 मेडन ओव्हरसह 2 फलंदाजांची विकेटही केली. कमिन्स आणि मिचेल स्टार्कच्या शानदार गोलंदाजीमुळं पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटकंही खेळू शकला नाही आणि 46.4 षटकांत 203 धावांवर आटोपला. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आला तेव्हा कर्णधार पॅट कमिन्सनं जबाबदारी स्वीकारली आणि 8 विकेट्स पडूनही आपल्या संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. या सामन्यात कमिन्सनं 31 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीनं 32 धावांची मौल्यवान खेळी केली.
Stand-in captain named as Australia re-shuffle their squad for Pakistan 🤔
— ICC (@ICC) November 6, 2024
Details 👇https://t.co/g00ys3lF4j
अचानक बदलला कर्णधार : पहिला सामना जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतील दुसरा वनडे सामना 8 नोव्हेंबरला ॲडिलेडमध्ये खेळवला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियानं एका रात्रीत आपला कर्णधार बदलला आहे. पॅट कमिन्सऐवजी 29 वर्षीय जोश इंग्लिसकडं संघाची कमान सोपवण्यात आली आहे. (Josh Inglish Captain of Australia) दुसऱ्या वनडेत पॅट कमिन्स कर्णधार असला तरी तिसऱ्या सामन्यात जोश इंग्लिश संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. कमिन्स तिसऱ्या वनडे सामन्यात संघाचा भाग असणार नाही. वनडे मालिकेनंतर, जोश इंग्लिस पाकिस्तानविरुद्धच्या T20I मालिकेतही संघाचं नेतृत्व करेल. पॅट कमिन्स या मालिकेतही खेळणार नाही.
Josh Inglis appointed as Australian captain for the 3rd ODI and the T20i series Vs Pakistan. pic.twitter.com/N0IuNIV0T9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2024
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर लक्ष केंद्रित : वास्तविक, पॅट कमिन्सशिवाय स्टीव्ह स्मिथ, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि मार्नस लॅबुशेन हे देखील पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळणार नाहीत. या सर्व खेळाडूंना बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज सेवियर बार्टलेट आणि स्पेन्सर जॉन्सन यांचा यष्टीरक्षक-फलंदाज जोश फिलिपसह ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा :