हॅमिल्टन Sachin vs Root After 151 Tests : स्टार इंग्लिश फलंदाज जो रुटचा अलीकडचा फॉर्म बघितला तर त्याची तुलना आता महान सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. भविष्यात सचिनचा कसोटी विक्रम कोणी मोडू शकला तर तो रुट असेल, असं मानलं जात आहे. बेन स्टोक्सकडे इंग्लंडचं कर्णधारपद सोपवल्यानंतर रुट आपली संपूर्ण ऊर्जा फलंदाजीसाठी वापरत आहे. त्यानंतर त्याचे आकडेही बदलले आहेत.
Can Joe Root surpass Sachin Tendulkar’s legendary record of 15,921 Test runs? pic.twitter.com/NA0VrGaf72
— OneCricket (@OneCricketApp) December 10, 2024
रुटची कामगिरी कशी : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर 33 वर्षीय रुटनं 151 सामन्यांमध्ये 12,886 धावा केल्या आहेत. यामुळं तो सर्वकालीन धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगपेक्षा फक्त 492 धावांनी मागे आहे. वास्तविक, रुट 2021 पासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्यानं 54 कसोटींमध्ये 56.25 च्या सरासरीनं आणि 19 शतकांसह 5,063 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, सचिन तेंडुलकर हा कसोटीत 50 पेक्षा जास्त शतकं करणारा एकमेव खेळाडू आहे, ज्यानं 51 शतके आणि 68 अर्धशतकं करत 15,921 धावांच्या विक्रमासह निवृत्ती घेतली.
JOE ROOT PLAYED ONE OF THE CRAZIEST SHOT EVER TO COMPLETE HUNDRED IN TEST CRICKET...!!!! 🥶
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2024
- The Greatest batter ever from England, 36 Test Hundreds, Freak. pic.twitter.com/sx0vrE5fuv
151 कसोटी सामन्यांनंतर दोन्ही फलंदाजांचे आकडे कसे :
रुट विरुद्ध तेंडुलकर 151 कसोटीनंतर : आपल्या कारकिर्दीतील 151 व्या कसोटीपर्यंत, रुटनं तेंडुलकरपेक्षा 30 अधिक डाव खेळले आणि त्यानं 12,886 धावा केल्या. जे महान भारतीय फलंदाजाच्या 11,939 धावांपेक्षा जास्त आहे. सचिनची सरासरी 54.02 आहे, तर रुटची 50.93 आहे. रुटच्या नावावर कमी शतकं आहेत (39 विरुद्ध 36) दुसरीकडे, रुटनं इतक्याच सामन्यांमध्ये अधिक अर्धशतकं (64 विरुद्ध 49) केली आहेत.
Joe Root joins the 150 Test club 🙌 pic.twitter.com/Y4hJa2O3PO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 28, 2024
परदेशी भूमीवर विक्रम कसा : 151 कसोटींनंतर, सचिन तेंडुलकरनं 87 परदेशी कसोटींमध्ये 23 शतकं आणि 28 अर्धशतकांसह 53.70 च्या सरासरीनं 6,821 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, जो रुटनं 73 परदेशी कसोटींमध्ये 15 शतकं आणि 32 अर्धशतकांसह 47.66 च्या सरासरीनं 6,128 धावा केल्या आहेत.
This is how good Joe Root is. pic.twitter.com/czReqwp8Wh
— England Cricket (@englandcricket) December 9, 2024
घरच्या मैदानावरील विक्रम कसा : घरच्या परिस्थितीतील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, सचिननं 64 घरच्या कसोटी सामन्यांमध्ये 54.44 च्या सरासरीनं 16 शतकं आणि 21 अर्धशतकांसह 5,118 धावा केल्या आहेत. तर जो रुटनं 78 घरच्या कसोटी सामन्यांमध्ये 54.94 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 32 अर्धशतकांसह 6,758 धावा केल्या आहेत.
प्रकार | तेंडुलकर | रुट |
कसोटी सामने | 151 | 151 |
डाव | 246 | 276 |
धावा | 11,939 | 12,886 |
सरासरी | 54.02 | 50.93 |
50 | 49 | 64 |
100 | 39 | 36 |
सचिन आणि रुट यांच्यात एकंदरीत सरस कोण?
तेंडुलकरला 151 कसोटी खेळताना शतक झळकावण्यासाठी सुमारे 6 डाव लागले, ज्यात 246 डावांमध्ये 39 शतकं आहेत. याउलट, रुटनं शतक झळकावण्यासाठी जवळपास 8 डाव खेळले आहेत. यामध्ये 276 डावांमध्ये 36 शतकांचा समावेश आहे. यावरुन तेंडुलकर आपल्या डावाचे शतकांमध्ये रुपांतर करण्यात अधिक माहिर होता हे दिसून येते. रुटनं 151 कसोटी सामन्यांनंतर तेंडुलकरपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जो रुटची कारकीर्द अद्याप संपलेली नाही आणि तो सतत प्रगती करत आहे, परंतु सचिनचे आकडे असे 'मैलाचे दगड' आहेत ज्यांनी क्रिकेट जगतात अनेक विक्रम रचले आहेत.
हेही वाचा :