नवी दिल्ली Jay Shah ICC : जय शाह हे क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत आणि बीसीसीआय सरचिटणीस म्हणून त्यांच्या कार्यकाळामुळं खेळातील सर्वात शक्तिशाली मंडळ म्हणून भारताची पकड मजबूत करण्यात मदत झाली आहे. आता शाह यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं (आयसीसी) अध्यक्ष बनवलं जाण्याची शक्यता आहे.
There is unlikely to be another candidate to oppose Jay Shah for the ICC top post. [RevSportz]
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2024
- JAY SHAH SET TO BECOME THE NEW BOSS OF ICC...!!!! pic.twitter.com/LBL5wJmR9K
तीन वर्षे राहणार अध्यक्ष : गव्हर्निंग बॉडी आणि त्याचे प्रमुख प्रसारण हक्क धारक स्टार यांच्यातील $4.46 बिलियन वादाच्या दरम्यान वर्तमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राजीनामा जाहीर केला. यासंदर्भात दिलेल्या अहवालात पुढं म्हटलं की, शाह यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन आघाडीचे संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याकडून नामांकनासाठी आधीच पाठिंबा मिळाला आहे. ते किमान तीन वर्षे आयसीसीचे अध्यक्ष राहण्याची अपेक्षा आहे.
1 डिसेंबरपासून सुरु होणार कार्यकाळ : "आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मंडळाला पुष्टी केली आहे की ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यावर ते पद सोडतील," असं आयसीसीच्या प्रवक्त्यानं एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. नोव्हेंबर 2020 मध्ये बार्कले यांची आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर 2022 मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली. आयसीसीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'वर्तमान संचालकांना आता 27 ऑगस्ट 2024 पर्यंत पुढील अध्यक्षांसाठी अर्ज सादर करावे लागतील आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल आणि नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होईल.
9 मतं मिळवण आवश्यक : जगमोहन दालमिया (1997 ते 2000) आणि शरद पवार (2010-2012) हे दोनच भारतीय आहेत ज्यांनी यापूर्वी ICC प्रमुखपद भूषवलं आहे. कोणत्याही व्यक्तीला ICC अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी, त्या व्यक्तीला 16 पैकी किमान नऊ मतं मिळणं आवश्यक आहे, जे 51 टक्के इतकं आहे.
हेही वाचा :