ETV Bharat / sports

India vs England Test : मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून 'आऊट'; काय आहे कारण? - मोहम्मद सिराज

Jasprit Bumrah Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलीय. त्यामुळं रांची कसोटीत बुमराहच्याऐवजी मुकेश कुमार किंवा अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Jasprit Bumrah Update
Jasprit Bumrah Update
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 12:35 PM IST

राजकोट Jasprit Bumrah Update : राजकोटमध्ये इंग्लंडचा दारुण पराभव केल्यानंतर भारतीय संघानं स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची इथं होणाऱ्या चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय. रांची कसोटीत जसप्रीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार किंवा फिरकीपटू अक्षर पटेलला संधी दिली मिळू शकते. मात्र, धरमशाला इथं होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराह संघात परतणार आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची इथं खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. (India vs England Test)

मालिकेत बुमराह भारताचा यशस्वी गोलंदाज : मिळालेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत राजकोटहून रांचीला जाणार नाही. जसप्रीत बुमराह राजकोटहून थेट अहमदाबादला रवाना होणार आहे. जसप्रीत बुमराहशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला रांचीत खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाणार नाही. जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण हाताळण्यासाठी संघ व्यवस्थापनानं हा निर्णय घेतलाय. जसप्रीत बुमराहनं या मालिकेत 80.5 षटकं गोलंदाजी केलीय. तसंच बुमराह या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला असून त्यानं तीन सामन्यात 17 बळी घेतले आहेत.

मुकेश कुमार होणार संघात सामील : जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या मालिकेतील पाचही कसोटी सामने खेळणार नसल्याचं या मालिकेपूर्वीच स्पष्ट करण्यात आलं होतं. यानुसार मोहम्मद सिराजला मालिकेतील दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर तो राजकोट कसोटीत परतला. दुसऱ्या कसोटीनंतर मुकेश कुमारला संघातून रिलीज करण्यात आलं होतं. रांची इथं खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी मुकेश कुमार संघात परतणार आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. मुकेश कुमार खेळत नसल्यास भारतीय संघ चार फिरकीपटूंसह मैदानात उतरु शकतो. अशा स्थितीत अक्षर पटेलचं खेळणं निश्चित मानलं जातंय.

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा विक्रमी विजय : राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघानं इंग्लंडचा 434 धावांनी दारुण पराभव केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 90 वर्षात इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं विक्रमी द्विशतक झळकावलं होतं. तसंच रवींंद्र जडेजानं अष्टपैलू कामगिरी करत पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात पाच बळी घेतले होते. यासह कर्णधार रोहित शर्मानंही पहिल्या डावात शतकी खेळी केली होती.

हेही वाचा :

  1. तिसऱ्या कसोटीतील पराभव इंग्लिश कर्णधाराच्या जिव्हारी; क्रिकेटच्या नियमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत केली मोठी मागणी
  2. India Vs England : भारतीय संघानं 180 मिनिटांत केलं इंग्लंडला चितपट, कसोटीत 90 वर्षातील सर्वात मोठा पराभव
  3. IND vs ENG 3rd Test : टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय, तिसरा सामना 434 धावांनी जिंकत इंग्लंडचं पानीपत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.