नवी दिल्ली ICC Player of the Month : टी 20 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला त्याच्या कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. आयसीसीनं जून महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. ज्यात पुरुष आणि महिला अशा दोन्ही पुरस्कारांमध्ये भारताचा दबदबा आहे. जसप्रीत बुमराहची जून महिन्यासाठी आयसीसीनं 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड केली आहे. त्याच्यासह या पुरस्कारासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाज हे स्पर्धेत होते.
Smriti Mandhana claimed her maiden ICC Player of the Month award for a spectacular showing in June 👌
— ICC (@ICC) July 9, 2024
More ➡ https://t.co/jmp8DAqanM pic.twitter.com/LNSE0ylygI
बुमराहला उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस : जसप्रीत बुमराहनं टी 20 विश्वचषक स्पर्धेत 8 सामन्यांत 15 विकेट घेत चमकदार कामगिरी केली. बुमराहनं वेळोवेळी संघासाठी महत्त्वाची षटकं टाकली आणि भारताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. हा पुरस्कार जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, "जूनसाठी आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून निवडून आल्यानं मला आनंद होत आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये काही संस्मरणीय आठवडे घालवल्यानंतर हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे." तसंच मला आमचा कर्णधार रोहित शर्मा आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या याच कालावधीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करायचे आहे आणि मला विजेते म्हणून निवडल्याबद्दल खूप आनंद झाल्याचंही तो म्हणाला.
India's bowling maestro caps off a phenomenal month of June with the ICC Men's Player of the Month Award 🤩
— ICC (@ICC) July 9, 2024
स्मृती मंधानाला महिला खेळाडूचा पुरस्कार : भारताची डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना हिची महिला क्रिकेटमधील 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. स्मृती मंधानानं आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग दोन शतकी खेळी खेळली होती. यासोबतच महिला क्रिकेटमध्ये भारतासाठी सलग 2 शतकं ठोकण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंधाना म्हणाली, "जूनसाठी आयसीसी महिला खेळाडू म्हणून निवडून आल्यानं मला आनंद होत आहे. मला वाटतं की संघानं ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळं मी खरोखरच खूश आहे. एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकून आमच्यासाठी योगदान देण्यात मला आनंद आहे. आशा आहे की आम्ही आमचा फॉर्म कायम ठेवू शकेन आणि मी भारतासाठी सामने जिंकण्यात अधिक योगदान देऊ शकेन."
हेही वाचा :