मुंबई Biggest Victory in SMAT T20 : सध्या भारतीय देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा खेळवली जात आहे. यात अनेक युवा खेळाडू आपलं कौशल्य दाखवत आहेत. दरम्यान, डावखुरा फिरकीपटू आबिद मुश्ताकनं आपल्या गोलंदाजीनं कहर केला. त्यानं अवघ्या 7 चेंडूत 4 विकेट घेत 3 षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 'क' गटातील हा सामना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी स्टेडियमवर खेळला गेला.
Best bowling figures in Men's T20s for Jammu & Kashmir:
— The Stats Kid (@TheStatsKid1523) November 27, 2024
6/31 (4) - Rasikh Salam vs Chhattisgarh, 2023
5/17 (4) - Umar Nazir Mir vs Jharkhand, 2019
4/2 (1.1) - Abid Mushtaq vs Arunachal Pradesh, today#SMAT2024
सात चेंडूत घेतले 4 बळी : वास्तविक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना झाला होता. या T20 सामन्यात अरुणाचल प्रदेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अत्यंत खराब कामगिरी केली. त्यांचा संपूर्ण संघ केवळ 9.1 षटकंच खेळू शकला आणि 32 धावांवर त्यांचा डाव गडगडला. या काळात आबिद मुश्ताकनं केवळ 1.1 षटकं टाकली. या 7 चेंडूत आबिदनं फक्त 2 धावा देत अरुणाचल संघाच्या 4 खेळाडूंना बळी बनवले. आबिदशिवाय रसिक सलामनं 1 बळी, आकिब नबीनं 3 आणि जम्मूकडून युद्धवीर सिंगनं 2 बळी घेतले.
अरुणाचलच्या नावावर लज्जास्पद विक्रम : फलंदाजीत अरुणाचल संघाच्या एकाही फलंदाजाला 5 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. या पराभवानंतर अरुणाचलच्या नावावर अतिशय लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2009 मध्ये त्रिपुरा संघ 30 धावांवर बाद झाला होता.
Lowest totals in Syed Mushtaq Ali Trophy:
— The Stats Kid (@TheStatsKid1523) November 27, 2024
30/10 (11.1) - Tripura vs Jharkhand, 2009
32/10 (9.1) - Arunachal Pradesh vs Jammu & Kashmir, today
40/10 (14.1) - Manipur vs Punjab, 2022#SMAT2024
जम्मू संघानं 18 चेंडूत सामना जिंकून केला विक्रम : यानंतर 33 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना जम्मू संघानं अवघ्या 18 चेंडूत सामना जिंकून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. जम्मू संघानं 102 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकून ऐतिहासिक विक्रम केला आहे. यापूर्वी 2009 मध्ये झारखंडनं त्रिपुराला 100 चेंडू शिल्लक असताना पराभूत केलं होतं.
Biggest wins in Syed Mushtaq Ali Trophy (by balls):
— The Stats Kid (@TheStatsKid1523) November 27, 2024
102 balls - Jammu & Kashmir vs Arunachal Pradesh, today
100 balls - Jharkhand vs Tripura, 2009
99 balls - Saurashtra vs Arunachal Pradesh, 2023#SMAT2024
18 चेंडूत जिंकला सामना : कामरान इक्बाल आणि युधवीर सिंग यांनी जम्मूच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी संघाची धावसंख्या 34 धावांपर्यंत नेली आणि अवघ्या 18 चेंडूत सामना संपवला. अरुणाचलला हा पराभव दीर्घकाळ लक्षात राहील. कामराननं 7 चेंडूत 10 धावा केल्या ज्यात त्यानं 1 चौकार लगावला. तर युधवीरनं 11 चेंडूत 21 धावा केल्या. यात त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
हेही वाचा :