अबूधाबी (युएई) IRE vs SA 3rd ODI Live Streaming : आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबर तर दुसरा सामना 4 ऑक्टोबर रोजी झाला. पहिल्या वनडे प्रमाणे दुसऱ्या वनडेतही दक्षिण आफ्रिकेनं आयर्लंडवर एकतर्फा विजय मिळवला. यानंतर आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 7 ऑक्टोंबर रोजी होत आहे. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकत मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकत आपली प्रतिष्ठा राखण्याचा आयरिश संघाचा प्रयत्न असणार आहे.
SPECTACULAR WIN BY THE PROTEAS! 🏏🇿🇦
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 4, 2024
The lethal bowling display by SA proves to be too solid for Ireland, who were unable to chase down the steep target set by the men in green and gold.
The Proteas win by 174 runs!
⚾️⚾️⚾️ Lizaad Williams - 3 wickets
⚾️⚾️ Bjorn Fortuin, Lungi… pic.twitter.com/H8yEythmfm
दक्षिण आफ्रिकेची विजयी आघाडी : आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली दोन सामन्यांची T20 मालिका 1-1 नं बरोबरीत सुटली. यानंतर बुधवार 2 ऑक्टोबरपासून यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आयर्लंडचा 139 धावांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 174 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
Not our night in Abu Dhabi
— Cricket Ireland (@cricketireland) October 4, 2024
▪️ South Africa 343-4 (50 overs)
▪️ Ireland 169 (30.3 overs)#IREvSA #BackingGreen #MyMaster11 pic.twitter.com/rDZbJinDbA
दक्षिण आफ्रिकेची घातक फलंदाजी : दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं निर्धारित 50 षटकांत चार गडी गमावून 343 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्सनं नाबाद 112 धावांचं योगदान देत उत्कृष्ट शतक झळकावलं. आपल्या शानदार खेळीदरम्यान ट्रिस्टन स्टब्सनं 81 चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. ट्रिस्टन स्टब्सशिवाय काईल व्हेरिननंही 67 धावा केल्या. तर आयर्लंडकडून क्रेग यंग, कर्टिस कॅम्फर, अँडी मॅकब्राईन आणि गेविन होई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयर्लंडचे फलंदाज अपयशी : यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आयरिश संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 7 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. संपूर्ण आयरिश संघ 30.3 षटकांत अवघ्या 169 धावा करुन बाद झाला. आयर्लंडकडून क्रेग यंगनं सर्वाधिक 21 धावांची खेळी खेळली. क्रेग यंगशिवाय मार्क एडेअर आणि ग्रॅहम ह्यूमनं 21-21 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी लिझार्ड विल्यम्सनं घातक गोलंदाजी करत तीन बळी घेतले. लिझार्ड विल्यम्सशिवाय लुंगी एनगिडी आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
An uphill task from here...
— Cricket Ireland (@cricketireland) October 4, 2024
▪️ South Africa 343-4 (50 overs)
▪️ Ireland 93-7 (20 overs)
SCORE: https://t.co/MoWo1RznYa
MATCH PROGRAMME: https://t.co/sKRI98drnm
WATCH: ROI/UK: TNT Sports 4
WATCH ELSEWHERE: https://t.co/btaULt2JvJ #IREvSA #BackingGreen #MyMaster11 pic.twitter.com/3p0bX6pcHA
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण दहा वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आठ सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडनं एक सामना जिंकला आहे. तर दोन्ही संघांदरम्यान एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
खेळपट्टी कशी असेल : अबुधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळते. जसजसा सामना पुढं जाईल तसतसं खेळपट्टीचं स्वरुप बदलू शकते. त्यामुळं टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
End of innings 🔚
— Cricket Ireland (@cricketireland) October 4, 2024
South Africa have set us a target of 344 to level the series.
▪️ South Africa 343-4 (50 overs)
SCORE: https://t.co/MoWo1RznYa
MATCH PROGRAMME: https://t.co/sKRI98drnm
WATCH: ROI/UK: TNT Sports 4
WATCH ELSEWHERE: https://t.co/btaULt2JvJ#IREvSA #BackingGreen… pic.twitter.com/XJurbRRmWM
आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका पूर्ण वेळापत्रक :
- पहिला T20 - 27 सप्टेंबर, दक्षिण आफ्रिका 8 विकेटनं विजयी
- दुसरा T20 - 29 सप्टेंबर (आयर्लंड 10 धावांनी विजयी)
- पहिला वनडे - 2 ऑक्टोबर (दक्षिण आफ्रिका 139 धावांनी विजयी)
- दुसरा वनडे - 4 ऑक्टोबर (दक्षिण आफ्रिका 174 धावांनी विजयी)
- तिसरा वनडे - आज (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवार, 7 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी इथं होणार आहे.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता सुरु होईल.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.
SPECTACULAR WIN BY THE PROTEAS! 🏏🇿🇦
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 4, 2024
The lethal bowling display by SA proves to be too solid for Ireland, who were unable to chase down the steep target set by the men in green and gold.
The Proteas win by 174 runs!
⚾️⚾️⚾️ Lizaad Williams - 3 wickets
⚾️⚾️ Bjorn Fortuin, Lungi… pic.twitter.com/H8yEythmfm
सामन्यासाठी दोन्ही संघ :
आयर्लंड वनडे संघ : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, गेविन होए, फिओन हँड, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, अँडी मॅकब्राईन, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग
दक्षिण आफ्रिका वनडे संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, नंद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, ब्योर्न फोर्टुइन, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रासी वान डेर डुसेन, काइल वेरिन आणि लिझार्ड विल्यम्स.
हेही वाचा :