ETV Bharat / sports

आयपीएलमधील अंतिम फेरीत विजयी होवो अथवा पराभूत, हैदराबादसह कोलकात्ता संघाला मिळणार 'इतके' कोटी - IPL 2024 Winner Prize Money - IPL 2024 WINNER PRIZE MONEY

IPL 2024 Winner Prize Money: आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघात २६ मेरोजी सामना होणार आहे. आयपीएलचं विजेतेपद मिळविणाऱ्या संघाला किती पैसे मिळतील ते जाणून घेऊ.

IPL 2024 Winner Prize Money
IPL 2024 Winner Prize Money (DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 11:23 AM IST

IPL 2024 Winner Prize Money: आयपीएल २०२४चा अंतिम सामना २६ मे (रविवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एमए चिदंबरम चेन्नई येथं खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अंतिम सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला ट्रॉफीसह कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या वर्षी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाईल? याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे.

विजेत्या संघाला किती पैसे मिळणार?: आयपीएल २०२४च्या विजेत्या संघाला केवळ ट्रॉफी मिळणार नाही तर बक्षीस म्हणून मोठी रक्कमदेखील मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२४च्या चॅम्पियन टीमला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघालादेखील 13 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ७ कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ६.५ कोटी रुपये मिळतील. यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ६.५ कोटी रुपये मिळतील. कारण बंगळुरू संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला ७ कोटी रुपये मिळणार आहेत.

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळतील? : आयपीएलमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतरही अनेक पुरस्कार दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेझ या पुरस्कारांचा समावेश आहे. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप पुरस्कार दिला जातो. ऑरेंज कॅप विजेत्याला १५ लाख रुपये दिले जातात. ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅप विजेत्याला १५ लाख रुपये दिले जातात. तर इमर्जिंग प्लेयर खेळाडूला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव: आयपीएलच्या १७ व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं राजस्थान रॉयल्सवर ३६ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलय. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १७५ धावा केल्या होत्या. यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना ठराविक अंतरानं विकेट गमावत राहिल्यानं संघाला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३९ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात शाहबाज अहमदनं हैदराबाद संघाकडून गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत सर्वाधिक ३ बळी घेतले. सनरायझर्स हैदराबाद संघानं आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आपलं स्थान पक्के केले आहे.

हेही वाचा

  1. सनरायझर्स हैदराबादचा संघ सहा वर्षानंतर अंतिम फेरीत उगवला, २६ मे रोजी विजेते पदासाठी कोलकात्ताबरोबर भिडणार - SRH VS RR
  2. नाशिकची जलतरणपटू तन्वी करणार "इंग्लिश खाडी" पार; थंडगार पाण्यात पोहण्याचा विक्रम रचणार? - Swimmer Tanvi Chavan Deore
  3. 'किंग' कोहलीने रचला नवा इतिहास; ठरला आयपीएलमध्ये ८००० धावा करणारा पहिला फलंदाज - Virat Kohli Record
  4. आरसीबीच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, जाणून घ्या त्याची कारकीर्द - Dinesh Karthik Retirement

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.