मुंबई IPL 2025 Retention Players List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या हंगामापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. हा लिलाव या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होऊ शकतो. पण त्याआधी, सर्व 10 फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी तयार करुन BCCI ला सबमिट करायची होती. त्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती. यानंतर आज सर्व संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
𝗥𝗘𝗧𝗔𝗜𝗡𝗘𝗗 💙
— Mumbai Indians (@mipaltan) October 31, 2024
“We have always believed that the strength of a family lies in its core and this belief has been reinforced during the course of recent events.
We are thrilled that the strong legacy of MI will be carried forward by Jasprit, Surya, Hardik, Rohit and Tilak -… pic.twitter.com/3QaEl88eCc
BCCI नं जाहीर केले नियम : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) नुकतेच रिटेन्शनबाबत नवीन नियम जारी केले आहेत. यानुसार फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडूंनाच रिटेन करु शकते. जर एखाद्या संघानं 6 पेक्षा कमी खेळाडूंना रिटेन केलं, तर अशा स्थितीत फ्रँचायझीला लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरण्याची संधी मिळेल.
IPL 2025 मेगा लिलावासाठी सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये एकूण रक्कम 120 कोटी रुपये आहे. अनकॅप्ड खेळाडूची मूळ धारणा किंमत 4 कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी, फ्रँचायझीला पहिल्या रिटेन केलेल्या खेळाडूसाठी 18 कोटी रुपये, दुसऱ्यासाठी 14 कोटी रुपये, तिसऱ्यासाठी 11 कोटी रुपये, चौथ्यासाठी 18 कोटी रुपये आणि पाचव्यासाठी 14 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
याचा अर्थ असा की जर एखाद्या संघानं 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि 1 अनकॅप्ड खेळाडूची जास्तीत जास्त संभाव्य मर्यादा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी आधीच त्यांच्या पर्समधून 79 कोटी रुपये खर्च केले असतील. यानंतर, संघ उर्वरित रकमेसह मेगा लिलावात उतरतील.
Superfans, here's your Diwali Parisu! 🎁💥
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 31, 2024
An @anirudhofficial Musical ft. IPL Retentions 2025 🥳🎶
#UngalAnbuden #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/FGTXm52v74
रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी :
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा
हार्दिक पंड्या
जसप्रीत बुमराह
सूर्यकुमार यादव
तिलक वर्मा
चेन्नई सुपर किंग्ज :
ऋतुराज गायकवाड
रवींद्र जडेजा
शिवम दुबे
मठीशा पाथीराणा
एमएस धोनी (अनकॅप्ड)
This Diwali, we’re doubling the fireworks! 🎆
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) October 31, 2024
Prabhsimran and Shashank are back to light up the next season with their explosive talent! 🔥#ShashankSingh #PrabhsimranSingh #PunjabKings #IPLRetentions #IPL2025 pic.twitter.com/uGL3kTVJsK
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर :
विराट कोहली
रजत पाटिदार
यश दयाल
कोलकाता नाईट रायडर्स :
सुनील नारायण
रिंकू सिंग
हर्षित राणा
आंद्रे रसेल
रमनदीप सिंग
दिल्ली कॅपिटल्स :
कुलदीप यादव
अक्षर पटेल
राजस्थान रॉयल्स :
संजू सॅमसन
यशस्वी जैस्वाल
रियान पराग
संदीप शर्मा
शिमरॉन हेटमायर
लखनऊ सुपर जायंट्स :
निकोलस पुराण
मयंक यादव
आयुष बडोनी
रवी बिश्नोई
मोहसीन खान
गुजरात टायटन्स :
शुभमन गिल
राशिद खान
साई सुदर्शन
शाहरुख खान
राहुल तेवतिया
सनरायझर्स हैदराबाद :
पॅट कमिन्स
हेनरिक क्लासेन
अभिषेक शर्मा
ट्रॅव्हिस हेड
नितिश रेड्डी
पंजाब किंग्ज :
शशांक सिंग (अनकॅप्ड)
प्रभसिमरन सिंग
हेही वाचा :