ETV Bharat / sports

ठाकूरच्या 'यश'स्वी गोलंदाजीपुढं गुजरातच्या फलंदाजांचं लोटांगण; लखनौच्या नवाबांचा गुजरातविरुद्ध आयपीएलच्या इतिहासात पहिलाच विजय - LSG vs GT - LSG VS GT

IPL 2024 LSG vs GT : आयपीएलमध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला. यासह त्यांनी या विजयानंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतलीय.

Yash Thakur यश ठाकूर
ठाकूरच्या 'यश'स्वी गोलंदाजीपुढं गुजरातच्या फलंदाजांचं लोटांगण; लखनऊच्या नवाबांचा गुजरातविरुद्ध आयपीएलच्या इतिहासात पहिलाच विजय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 9:25 PM IST

Updated : Apr 8, 2024, 6:38 AM IST

लखनौ IPL 2024 LSG vs GT : लखनौ सुपर जायंट्ससाठी (LSG) रविवार हा दिवस ऐतिहासिक होता. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघानं लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (जीटी) 33 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात लखनौचा गुजरातविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच लखनौकडून गुजरातचा पराभव : या सामन्यापूर्वी गुजरात आणि लखनौ यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळण्यात आले. प्रत्येक वेळी गुजरातनं विजय मिळवला होता. म्हणजेच या सामन्यापर्यंत लखनौचा संघ गुजरातविरुद्ध विजयाचं खातं उघडू शकला नव्हता. दोन्ही संघांमधील हा पाचवा सामना होता. अशा परिस्थितीत लखनौच्या संघानं घरच्या मैदानावर खेळलेला हा सामना जिंकून संस्मरणीय बनवलाय.

लखनौच्या यशचे 5 तर कृणालचे 3 बळी : या सामन्यात लखनौ संघानं गुजरातला 164 धावांचं लक्ष्य दिलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून गुजरातचा संघ 18.5 षटकांत 130 धावांवर सर्वबाद झाला. त्यांना सामना गमवावा लागला. या सामन्यात साई सुदर्शननं जीटीसाठी सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर राहुल तेवतियानं 30 आणि शुभमन गिलनं 19 धावा केल्या. लखनौ संघाकडून वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या यांनी शानदार गोलंदाजी केली. यशनं 30 धावा आणि 5 विकेट घेत गुजरातची फलंदाजी उद्धवस्त केली. तर कृणालनंही 11 धावांत 3 बळी घेतले. नवीन उल हक आणि रवी बिश्नोई यांनी 1-1 विकेट मिळवली.

राहुल आणि स्टॉइनिस यांची संयमी खेळी : तत्पुर्वी या सामन्यात लखनौ संघानं प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 163 धावा केल्या. संघानं पहिला विकेट क्विंटन डी कॉकचा (6) अवघ्या 6 धावांत गमावला. यानंतर देवदत्त पडिक्कलच्या (7) रुपानं त्यांची दुसरी विकेटही 18 धावांवर पडली. यानंतर कर्णधार केएल राहुलनं 33 आणि मार्कस स्टॉइनिसनं 58 धावा करत संघाचा डाव सावरला. शेवटी आयुष बडोनीनं 11 चेंडूत 20 आणि निकोलस पुरननं 22 चेंडूत 32 धावा करत संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. दुसरीकडे, गुजरात संघाकडून वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर फिरकीपटू राशिद खानला 1 विकेट मिळाली.

हेही वाचा :

  1. मुंबई इंडियन्सचा 'उन्हाळा' संपला! IPL 2024 चा पहिला दणदणीत विजय; दिल्लीला 29 धावांनी दिला पराभवाचा धक्का - MI VS DC IPL 2024
  2. 'जॉस' द 'बॉस'! बलटरच्या शतकापुढं कोहलीचं 'संथ' शतक व्यर्थ; राजस्थानच्या विजयाचा 'चौकार' - RR vs RCB

Last Updated : Apr 8, 2024, 6:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.