ETV Bharat / sports

अंतिम सामन्यानंतर 'कही खुशी कही गम'; काव्या मारनंच्या डोळ्यात अश्रू तर शाहरुख खानचा जल्लोष - kavya maran emotional - KAVYA MARAN EMOTIONAL

IPL 2024 Final : आयपीएलच्या या हंगामात फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम करणाऱ्या हैदराबादला फायनलमध्ये कोलकात्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन आपले अश्रू लपवताना दिसली.

अंतिम सामन्यानंतर 'कही खुशी कही गम'
अंतिम सामन्यानंतर 'कही खुशी कही गम' (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 9:40 AM IST

चेन्नई IPL 2024 Final : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं. या हंगामात फलंदाजीत विक्रम करणारा संपूर्ण हैदराबाद संघ फ्लॉप ठरला. हैदराबाद संघ 18.3 षटकांत केवळ 113 धावांवर गारद झाला. हे लक्ष्य कोलकातानं अवघ्या 10.3 षटकांत गाठलं. हैदराबादचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर या सामन्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पराभवानंतर काव्या मारनच्या डोळ्यात अश्रू : सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. कोलकात्याच्या विजयानंतर, काव्या मारन त्यांच्या विजयासाठी आणि हैदराबादच्या चमकदार प्रयत्नासाठी टाळ्या वाजवताना रडू लागते. तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते. यानंतर काव्या मारन कॅमेराला पाठमोरे जात, मागे वळून तिचे अश्रू पुसते. कोलकात्याच्या विजयानंतर काव्या मारनच्या अश्रूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शाहरुख खाननं गौतम गंभीरच्या कपाळाचं घेतलं चुंबन : कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान या विजयानंतर खूप आनंदी दिसत होता. शाहरुख खाननं कोलकात्याला अंतिम फेरीत नेणाऱ्या गौतम गंभीरला मिठी मारली. दोघांचा हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. गौतम गंभीरनं एका मुलाखतीत सांगितलं की, तो शाहरुख खानच्या विनंतीवरुनच लखनऊ सुपरजायंट्समधून कोलकात्यात दाखल झाला होता.

रिंकू सिंगनं ट्रॉफीला मारली मिठी : विजयानंतर केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंग खूपच आनंदी दिसत होता. त्याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ट्रॉफी हातात घेतल्यानंतर रिंकू ती हृदयाशी धरुन त्यावर डोकं ठेवताना दिसतोय. रिंकू सिंगनं यावर्षी फारशी फलंदाजी केलेली नाही. मात्र, गेल्या हंगामात त्यानं अप्रतिम कामगिरी केली होती.

हेही वाचा :

  1. 'कोरबो, लोरबो, जीतबो'; अंतिम सामन्यात कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा कोरलं चषकावर नाव - KKR vs SRH
  2. आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला इतिहास रचण्याची संधी; आतापर्यंत तीनवेळा 'असं' घडलं - KKR vs SRH

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.