International Everest Day हैदराबाद: माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. या शिखराची उंची 8848 मीटर आहे. प्रत्येक गिर्यारोहकाचं हे शिखर गाठण्याचं स्वप्न असतं. अनेक दशकांपासून दुर्गम परिस्थितीमुळं लोक या पर्वतापर्यंत पोहोचू शकत नव्हते.
70 वर्षांपूर्वी 1953 मध्ये न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि नेपाळचे शेर्पा तेनझिंग यांनी प्रथमच एव्हरेस्ट गाठून इतिहासात आपलं नाव नोंदवलं होतं. हिलरी आणि शेर्पा 29 मे 1953 रोजी एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यशस्वी झाले होते. या दिवसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा केला जातो.
- आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवसाचा इतिहास : 29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी नेपाळचे तेनझिंग शेर्पा हे पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. त्यांच्या या धाडसी कृतीने अशक्य वाटणारं हे काम शक्य करण्याची प्रेरणा दिली. सर एडमंड हिलरी यांच्या निधनानंतर 2008 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवसाचं महत्त्व : नेपाळमधील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा केला जातो. हा दिवस इतर गिर्यारोहकांना हिमालयातील एव्हरेस्ट शिखरावर चढण्यासाठी प्रेरणा देतो. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस हा शिखरावर चढण्याच्या प्रयत्नात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे.
आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस कसा साजरा केला जातो? : आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस या दिवशी, नेपाळ आणि चीनच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी एव्हरेस्ट शिखरावर चढाई करताना प्राणांची आहुती देणाऱ्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ध्वजारोहण केलं जातं. या दिवशी हिमालयीन प्रदेशात होत असलेल्या हवामान बदलाबद्दल लोकांना जागरुक करण्याचं कामही केलं जातं. सोशल मीडियावर हॅशटॅग, फोटो आणि स्टोरी शेअर करूनही हा दिवस साजरा केला जातो.
- माउंट एव्हरेस्ट किती उंच आहे? : माउंट एव्हरेस्टची उंची 29,032 फूट (8,849 मीटर) आहे. 2020 मध्ये चीन आणि नेपाळ यांच्यातील सहकार्यातून ही आकडेवारी समोर आलीय. याआधी पर्वताच्या उंचीबाबत दोन्ही देशांमध्ये मतभेद होते. चीननं हे शिखर 29,017 फूट (8,844 मीटर) असल्याचा दावा केला तर नेपाळनं ते 29,028 फूट (8,848 मीटर) असल्याचं सांगितलं होत.
- माउंट एव्हरेस्ट रेकॉर्ड : एव्हरेस्टवर चढाई करण्याचा विक्रम अनेकांनी केलाय. नेपाळच्या आपा शेर्पा यांनी 21 वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा विक्रम केला आहे. हरियाणातील विकास कौशिक आणि त्यांची पत्नी सुषमा कौशिक हे एव्हरेस्टवर चढणारे सर्वात तरुण जोडपे आहेत. 45 वर्षीय प्रेमलता अग्रवाल या एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वयोवृद्ध महिला ठरली आहे.
एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची पहिली महिला गिर्यारोहक : भारताची पहिली महिला गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी 1984 साली एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश मिळवलं होतं. 1984 साली भारतानं एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी एक संघ तयार केला होता. या संघात 16 जण होते. यात 11 पुरुष गिर्यारोहक आणि 5 महिला गिर्यारोहक होत्या. कठीण चढाई आणि वादळांवर मात करून बिचेंद्री पाल माउंट एव्हरेस्ट गाठणारी पहिली महिला ठरली. बिचेंद्री पाल यांना त्यांच्या धाडसी कारनाम्याबद्दल अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पर्वतारोहण प्रतिष्ठानकडून सुवर्णपदक आणि उत्तर प्रदेश सरकारकडून सुवर्णपदक प्रदान करण्यात आलय.
हेही वाचा
- मानवी हस्तक्षेपामुळे सुमारे 10 लाख प्राण्यासह वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या आंतरराष्ट्रीय जैवविविधतेचं महत्त्व - biological diversity 2024
- मधमाशा केवळ आरोग्यासाठीच नाही तर निसर्गासाठीही आहेत उपयुक्त - World Bee Day 2024
- भारतातील तब्बल 22 कोटी नागरिक उच्चरक्तदाबाने ग्रस्त, 46 टक्के लोक असतात अनभिज्ञ - WORLD HYPERTENSION DAY 2024