ETV Bharat / sports

भारतीय महिलांचा आफ्रिकेवर 4 धावांनी विजय, मालिकाही घातली खिशात; सामन्यात झाली चार शतकं - INDW vs SAW - INDW VS SAW

INDW vs SAW 2nd ODI : भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं मालिकेवर कब्जा केलाय. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि मारिजानं यांची शतकी खेळी व्यर्थ गेली.

भारतीय महिलांचा आफ्रिकेवर 4 धावांनी विजय
भारतीय महिलांचा आफ्रिकेवर 4 धावांनी विजय (BCCI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 10:44 PM IST

बंगळुरु INDW vs SAW 2nd ODI : दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय महिला संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिलांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शतकी खेळीमुळं भारतानं 325 धावांचा डोंगर उभारला. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकन संघ 6 विकेट गमावून 321 धावा करु शकला. परिणामी त्यांना 4 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय कर्णधार हरमनप्रीतला तिच्या खेळीसाठी सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

मंधाना-हरमनप्रीतची शतकी खेळी : दोन्ही संघांमधील हा सामना खूपच रोमांचक झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी शतकी खेळी खेळली. स्मृती मंधानाचं हे सलग दुसरं शतक होतं. मागील सामन्यातही तिनं 117 धावांची खेळी केली होती. या सामन्यात तिनं 125 चेंडूत 136 धावा केल्या. यासह कर्णधार हरमनप्रीतनंही 88 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी केली. या दोन फलंदाजांशिवाय शेफाली वर्मानं 20, दयालन हेमलतानं 24 आणि ऋचा घोषनं 25 धावा केल्या. परिणामी भारतीय संघानं 325 धावा केल्या.

लॉरा-मारिजानंही केलं शतक : भारताच्या 325 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेनंही शानदार खेळ करत शेवटच्या चेंडूपर्यंत लक्ष्याचा पाठलाग केला. त्यांच्याकडून कर्णधार लॉरा वोल्वार्डनं शेवटच्या चेंडूपर्यंत धावसंख्येचा पाठलाग करताना 135 चेंडूत 135 धावा केल्या. याशिवाय मॅरिझान कॅपनंही 94 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह 114 धावांची खेळी केली. मात्र त्यांची खेळी आपल्या संघाला विजयापर्यंत नाही नेऊ शकली.

शेवटचं षटक ठरलं रोमांचक : शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 11 धावांची गरज होती. चेंडू पूजा वस्त्राकरच्या हातात होता. वस्त्राकरनं अप्रतिम गोलंदाजी करत दोन फलंदाजांना बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर आफ्रिकेला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती, त्यावर त्यांना एकही धाव काढता आली नाही. परिणामी त्यांना 4 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह भारतीय संघानं 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. तसंच भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर अरुंधती रेड्डी आणि स्मृती मंधाना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या दोन्ही संघांमध्ये तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 23 जून रोजी होणार आहे.

हेही वाचा :

  1. विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात स्मृती मंधानाचं 'राज'; सलग दुसरं शतक झळकावत रचला इतिहास - smriti mandhana
  2. टी-20 विश्वचषक कोण जिंकणार ? 17 वर्षांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास भारत सज्ज - T20 World Cup 2024
  3. भारतीय महिला संघाचा आफ्रिकेवर दणदणीत विजय; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण - IND W vs SA W

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.