ETV Bharat / sports

'एमएस धोनी माझा मित्र नाही...'; माहीबद्दल हे काय बोलून गेला खलील अहमद - Khaleel Ahmed - KHALEEL AHMED

Khaleel Ahmed on MS Dhoni : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदनं एमएस धोनीबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला की मी एमएस धोनीला आपला मित्र मानत नाही.

khaleel ahmed
खलील अहमद (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 19, 2024, 2:48 PM IST

नवी दिल्ली Khaleel Ahmed on MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मैदानावर तसंच मैदानाबाहेर सर्वत्र चाहते आहेत. काही त्याच्याकडून शिकतात तर काही क्रिकेटपटू त्याला आपल्या पालकांसारखं मानतात. 2007 टी 20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये भारतासाठी चॅम्पियन ट्रॉफी जिंकणाऱ्या माहीचा भारतातील चाहत्यांमध्ये खूप आदर आहे. काही जण तर सामन्यातच मैदानावर उडी मारतात आणि त्याच्या पायाला स्पर्श करताना आपण बघितलं आहे.

धोनीला मानतो गुरु : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदनंही त्याला आपला गुरु म्हटलं आहे. समालोचक आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना, खलीलनं खुलासा केला की तो माजी भारतीय कर्णधाराच्या खूप जवळ आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला आपला गुरु मानतो. याशिवाय खलीलनं त्याच्याबद्दलचे अनेक किस्से सांगितले. आकाशनं त्याला एमएस धोनीला फुलं देण्याबद्दल विचारलं ज्याचा फोटो व्हायरल झाला होता. याच्या उत्तरात खलीलनं सांगितलं की, हे फूल त्याला एमएस धोनीनं न्यूझीलंड दौऱ्यात दिले होते. धोनीने चाहत्यांकडून फुले घेऊन त्याला दिली. खलीलनं सांगितलं की, हा अनपेक्षित क्षण त्याच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला, जेव्हा एका चाहत्यानं त्याचा फोटो काढला.

स्वप्न पुर्ण करण्यास मदत : एमएस धोनीबद्दल खलील म्हणाला, 'माही भाई माझा मित्र नाही, माझा मोठा भाऊ नाही, तर तो माझा गुरु आहे. लहानपणापासून मला भारतासाठी पहिलं षटक टाकणारा गोलंदाज व्हायचं होतं, कारण मी झहीर खानला मोठं होताना पाहिलं होतं. आशिया कपमध्ये 'माही भाई'नं मला पहिलं षटक टाकण्यास सांगितलं. मी इतक्या वेगानं धावलो की मला वाटलं की मी थोडा वेळ दिला तर कदाचित त्याचा विचार बदलेल. लहानपणापासूनच, झहीर खानला नवीन चेंडू घेताना पाहताना तो मोठा झाल्यामुळं भारतासाठी सामन्यात पहिलं षटक टाकण्याचं त्याचं स्वप्न होतं. असा खुलासा खलीलनं केला. तसंच एमएस धोनीनं त्याला हे स्वप्न पुर्ण करण्यास मदत केल्याचंही त्यानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. 5 भाऊ-बहिणीच्या जोड्या ज्यांनी खेळलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट; दोन तर अजूनही खेळत आहेत - Raksha Bandhan
  2. ये डर अच्छा है...! भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी कांगारुंचा कर्णधार क्रिकेटपासून दूर, म्हणाला... - Pat Cummins on Break

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.