हैदराबाद Highest Victory Margin for India in T20I : भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेश विरद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर T20 मालिकाही जिंकली आहे. भारताने कसोटी मालिका2-0 नं जिंकली. तर T20 मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघानं 133 धावांनी दणदणीत विजय मिळवला. जो भारतीय संघाचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा तिसरा विजय ठरला. संजू सॅमसन त्याच्या शतकामुळं सामनावीर ठरला. तर हार्दिक पांड्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
— BCCI (@BCCI) October 12, 2024
Congratulations to #TeamIndia on winning the #INDvBAN T20I series 3⃣-0⃣ 👏👏
Scorecard - https://t.co/ldfcwtHGSC@IDFCFIRSTBank pic.twitter.com/npNJ2jmryU
भारताची विक्रमी धावसंख्या : या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमारनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघानं 297 धावांचा हिमालय उभारला. जी भारतीय संघाची T20 इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तर कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये कोणत्याही संघाची आंतरराष्ट्रीय T20 मध्ये ही सर्वोच्च धावसंख्या होती. भारताकडून संजू सॅमसन (111), सूर्यकुमार यादव (75) आणि हार्दिक पांड्या (47) यांनी तुफानी खेळी खेळली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ खेळायला आला आणि लक्ष्याच्या खूप मागे राहिला. बांगलादेश संघानं 20 षटकांत केवळ 164/7 धावा केल्या.
Sublime century, records broken and flurry of sixes 💥#TeamIndia were unstoppable in Hyderabad tonight 💙
— BCCI (@BCCI) October 12, 2024
Scorecard - https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cgW66Tohxy
बांगलादेशचे फलंदाज अपयशी : भारताच्या विक्रमी धावसंख्येसमोर बांगलादेशच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली, त्यांचा फलंदाज परवेझ हुसेन (0) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मयांक यादवचा बळी ठरला. काही वेळानं वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजांनी देण्यात आले, त्यानं आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर (चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर) तनजीद हसनला (15) झेलबाद केले. तनजीद बाद झाला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या केवळ 35 धावा होती. बांगलादेशच्या डावाच्या विकेट्स सातत्यानं पडत होत्या, 59 च्या धावसंख्येवर कर्णधार नझमुल हुसेन शांतो (14) यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद झाला. यानंतर सातत्यानं बांगलादेशच्या विकेट पडत राहिल्या. परिणामी त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
Captain @surya_14kumar collects the trophy as #TeamIndia complete a 3⃣-0⃣ T20I series win in Hyderabad 👏👏
— BCCI (@BCCI) October 12, 2024
Scorecard - https://t.co/ldfcwtIeIa#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KUBFxEHgcN
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये संघाची सर्वोच्च धावसंख्या :
- 314/3 - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, 2023
- 297/6 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 278/3 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
- 278/4 – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्कीये, इल्फोव्ह काउंटी, 2019
- 268/4 - मलेशिया विरुद्ध थायलंड, हांगझोऊ, 2023
- 267/3 - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, तरोबा, 2023
India with the most clean sweeps in the bilateral T20i series. 🇮🇳 pic.twitter.com/PwYlhNQVXs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
आंतरराष्ट्रीय T20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक बाऊंड्री :
- 47 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 43 - झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्किए, इल्फोव्ह काउंटी, 2019
- 42 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023
- 42 - भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
- 41 - श्रीलंका विरुद्ध केनिया, जोहान्सबर्ग, 2007
- 41 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
BCCI POSTER FOR FASTEST T20I CENTURIES FOR INDIA. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
- Rohit Sharma, The Hitman tops!! pic.twitter.com/ieGSw256Rw
आंतरराष्ट्रीय T20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार :
- 26 - नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, 2023
- 23 - जपान विरुद्ध चीन, मोंग कॉक, 2024
- 22 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
- 22 - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
- 22 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- India's highest T20i score.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
- Most sixes for India in an innings.
- India's joint highest powerplay score.
- India's fastest team 100.
- India's fastest team 150.
- India's fastest team 200.
- India's fastest team 250.
INDIAN BATTERS MADNESS AT THE UPPAL...!!! 🤯🇮🇳 pic.twitter.com/dhE7G60QUD
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये धावांच्या बाबतीत भारताचा विजय :
- 168 धावा - विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, 2023
- 143 धावा - विरुद्ध आयर्लंड, दुबलिन, 2018
- 133 धावा - विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 106 धावा - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2023
- 101 धावा - विरूद्ध अफगाणिस्तान, दुबई, 2022
- 100 धावा - विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, 2024
THE HISTORIC SCORECARD. 🥶🇮🇳 pic.twitter.com/qOgiLzVlGZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
पुरुषांच्या T20 मध्ये सर्वाधिक वेळा 200+ धावा करणारे संघ :
- 37 - भारत
- 36 - सॉमरसेट
- 35 - चेन्नई सुपर किंग्ज
- 33 - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
- 31 - यॉर्कशायर
T20I मध्ये एका कॅलेंडर वर्षात 200 पेक्षा जास्त धावा :
- 7 - 2023 मध्ये भारत
- 7 - 2024 मध्ये जपान
- 6 - 2022 मध्ये इंग्लंड
- 6 - 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका
- 6 - 2024 मध्ये भारत
🚨 HISTORY AT THE UPPAL...!!! 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
- India registered their highest ever total in T20is. pic.twitter.com/RABFxKZkDr
पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक चौकार :
- 81 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023
- 71 - बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, सोफिया, 2022
- 70 - भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 69 - बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, सोफिया, 2022
- 68 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग, 2015
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वोच्च पॉवरप्ले धावा :
- 82/1 विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
- 82/2 विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, 2021
- 78/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2018
- 77/1 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, 2023
- 77/1 विरुद्ध श्रीलंका, नागपूर, 2009
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20I विजय (सुपर ओव्हरच्या विजयासह) :
- 29 - युगांडा (2023)
- 28 - भारत (2022)
- 21 - टांझानिया (2022)
- 21* - भारत (2024)
- 20 - पाकिस्तान (2020)
हेही वाचा :