पर्थ BGT 2024-25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारतानंही आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघातील काही खेळाडू ऑस्ट्रेलियालाही पोहोचले आहेत. दोन्ही संघांदरम्यान खेळली जाणारी ही कसोटी मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे, पण ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे आकडे काही खास नाहीत. मात्र, गेल्या दोन दौऱ्यांपासून भारतीय संघानं कामगिरीत सुधारणा केली आहे.
King Kohli arrives in Perth! 🇮🇳👑
— Pavan kumar Reddy (@pavan_bijjam) November 11, 2024
Virat Kohli touched down in Australia on the evening of 10th November, becoming the first Indian player to land for the much-anticipated Border-Gavaskar Trophy.#KingKohli #BorderGavaskarTrophy #BGT2024 #ViratKohli #TeamIndia #Cricket pic.twitter.com/4aOxdxTA0I
ऑस्ट्रेलियात भारतीय संघाची कामगिरी कशी : भारतीय संघानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सात वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. या सात मालिकेदरम्यान दोन्ही संघांमध्ये एकूण 27 कसोटी सामने खेळले गेले आहेत. तर भारतीय संघानं या 27 पैकी फक्त 6 मॅच जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियानं 14 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताच्या सहापैकी चार विजय गेल्या दोन दौऱ्यांमध्ये मिळाले आहेत. भारतीय संघानं 2012 मध्ये एकदा ऑस्ट्रेलियालाही क्लीन स्वीप केलं होतं.
मागील दोन दौरे ऐतिहासिक : भारतीय संघाचे मागील दोन ऑस्ट्रेलियन दौरे भारतीय चाहत्यांसाठी ऐतिहासिक ठरले आहेत. खरं तर, भारतीय संघानं या गेल्या दोन दौऱ्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि या दोन्ही प्रसंगी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभवही केला आहे. भारतीय संघानं 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. भारतीय संघानं दोन्ही वेळा चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. यावेळीही भारतीय संघ आपली खास कामगिरी कायम ठेवेल अशी पूर्ण आशा आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
हेही वाचा :