नवी दिल्ली India Cricket Team Next Match : भारतीय क्रिकेट संघानं अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केला होता. जिथं भारतीय संघ तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळला होता. भारतीय संघ टी 20 मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. मात्र, एकदिवसीय मालिकेत त्यांना 0-2 नं पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ आपली पुढची मालिका कोणासोबत आणि कधी खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला भारतीय संघाच्या पुढील वेळापत्रकाबद्दल सांगणार आहोत. संघ सध्या ब्रेकवर असला तरी त्यानंतरचं वेळापत्रक मात्र अतिशय व्यस्त असणार आहे.
India have no ODIs scheduled in 2024 now.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 7, 2024
- They'll play 3 more ODIs against England before the 2025 Champions Trophy. 🏆 pic.twitter.com/5u3ZGMqF4V
भारतीय संघाची पुढची मालिका कधी : श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना तब्बल 43 दिवसांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. आता 19 सप्टेंबरपासून भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतीय संघाची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध असेल, ती कसोटी मालिका असेल आणि ती भारतातच खेळली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये 3 टी-20 सामनेही होणार आहेत. ही कसोटी मालिका 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर आणि टी 20 मालिका 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - चेन्नई (19 ते 23 सप्टेंबर)
- दुसरी कसोटी - कानपूर (27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर)
- पहिला टी 20 - धर्मशाला (6 ऑक्टोबर)
- दुसरा टी 20 - दिल्ली (9 ऑक्टोबर)
- तिसरा टी 20 - हैदराबाद (12 ऑक्टोबर)
CAPTAIN ROHIT SHARMA is back in Mumbai.
— Johns. (@CricCrazyJohns) August 9, 2024
- India's next match on September 19th. 🔥 pic.twitter.com/rX5MwWqhbd
न्यूझीलंड विरुद्ध मालिका : बांगलादेशनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यात दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून शेवटचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - बेंगळुरु (16 ते 20 ऑक्टोबर)
- दुसरी कसोटी - पुणे (24 ते 28 ऑक्टोबर)
- तिसरी कसोटी - मुंबई (1 ते 5 नोव्हेंबर)
India's next match on September 19th....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) August 7, 2024
- Test against Bangladesh at Chepauk. pic.twitter.com/UU24GgQGnA
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार टी-20 मालिका : बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन संघांचं यजमानपद भूषवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. या दौऱ्यात त्यांना 4 टी-20 सामने खेळायचे आहेत. ही मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला टी 20 - डर्बन (8 नोव्हेंबर)
- दुसरा टी 20 - गकबेर्हा (10 नोव्हेंबर)
- तिसरा टी 20 - सेंच्युरियन (13 नोव्हेंबर)
- चौथा टी 20 - जोहान्सबर्ग (15 नोव्हेंबर)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वांचं लक्ष : भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका उभय संघांदरम्यान खेळली जाईल, ज्यात दिवस-रात्र कसोटीसह एकूण 5 कसोटी सामने होतील. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत खेळवली जाणार आहे. या मालिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - पर्थ (22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर)
- दुसरी कसोटी - ॲडीलेड (6 डिसेंबर ते 10 डिसेंबर)
- तिसरी कसोटी - ब्रिस्बेन (14 डिसेंबर ते 18 डिसेंबर)
- चौथी कसोटी - मेलबर्न (26 डिसेंबर ते 30 डिसेंबर)
- पाचवी कसोटी - सिडनी (3 जानेवारी ते 7 जानेवारी)
इंग्लंड विरुद्ध मालिकेनं होणार नवीन वर्षाची सुरुवात : भारतीय संघ पुढील वर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ आता या एकदिवसीय मालिकेद्वारे एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला टी 20 - चेन्नई (22 जानेवारी)
- दुसरा टी 20 - कोलकाता (25 जानेवारी)
- तिसरा टी 20 - राजकोट (28 जानेवारी)
- चौथा टी 20 - पुणे (31 जानेवारी)
- पाचवा टी 20 - मुंबई (2 फेब्रुवारी)
- पहिला एकदिवसीय - नागपूर (6 फेब्रुवारी)
- दुसरा एकदिवसीय - कटक (9 फेब्रुवारी)
- तिसरा एकदिवसीय - अहमदाबाद (12 फेब्रुवारी)
हेही वाचा :