ETV Bharat / sports

विनेश फोगटचं 52 किलो होते वजन, रात्रभर प्रयत्न केले, केसंही कापले, पण...; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली 'इनसाईड स्टोरी' - Vinesh Phogat Disqualified - VINESH PHOGAT DISQUALIFIED

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगटच्या अपात्रतेवर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पौडीवाला यांनी मंगळवारी रात्री उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर प्रत्यक्षात काय घडलं ते सांगितलं. (Vinesh Phogat Disqualification)

Vinesh Phogat
विनेश फोगट (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 7, 2024, 5:49 PM IST

Updated : Aug 7, 2024, 7:25 PM IST

पॅरिस Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर सर्व भारतीय चाहत्यांचं मन दु:खी झालं आहे. विनेशच्या या वजनाच्या वादाबद्दल आणखी एक अपडेट समोर आलं आहे. एका भारतीय प्रशिक्षकानं सांगितलं की सकाळी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं. (Vinesh Phogat Wrestling)

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पौडीवाला (ANI)

काय म्हणाले वैद्यकीय अधिकारी : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पौडीवाला यांनी मंगळवारी रात्री उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर प्रत्यक्षात काय घडलं ते सांगितलं. मंगळवारी रात्री विनेशचं वजन 52 किलो होतं. तिनं सायकलिंग, स्किपिंग इत्यादी करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. गगन नारंग, दिनशॉ परडीवाला, तिचे पती, फिजिओ, वैद्यकीय कर्मचारी, IOA अधिकारी आणि OGQ (ऑलिम्पिक गोल्ड क्विझ) यांनी तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर काम केलं. मात्र आम्ही त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नसल्याचं डॉ. दिनशॉ पौडीवाला यांनी सांगितलं. (Vinesh Phogat Disqualified from Olympics)

अथक प्रयत्नांनंतर 100 ग्रॅम वजन अधिक : भारतीय दलाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले, 'आम्हाला असं आढळलं की स्पर्धेनंतर तिचं वजन सामान्य पातळीवर पोहोचलं आहे आणि प्रशिक्षकानं सामान्य वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरु केली जी ती नेहमी विनेशसोबत फॉलो करत आहे. हे असं आहे ज्यानं त्याच्याबरोबर बराच काळ काम केलं, त्यांचा विश्वास होता की ते साध्य करण्यायोग्य आहे आणि रात्रभर आम्ही वजन कमी करण्याची प्रक्रिया केली. मात्र सकाळी आम्हाला असं आढळून आलं की आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही तिचं वजन 50 किलो गटात 100 ग्रॅमनं जास्त होतं आणि त्यामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं.

वजन कमी करण्यासाठी केसही कापले : मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पौडीवाला म्हणाले, 'आम्ही रात्रभर तिचे केस लहान करणे यासह सर्व संभाव्य कठोर उपाय केले आणि हे सर्व असूनही, आम्ही त्या 50 किलो वजनाच्या श्रेणीत पोहोचू शकलो नाही. या अपात्रतेनंतर सावधगिरीचा उपाय म्हणून विनेशला डिहायड्रेशन टाळण्यासाठी काही इंट्राव्हेनस फ्लुइड्स देण्यात आलं होतं आणि सर्व काही सामान्य आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही काही रक्त तपासणी करुन घेतो, म्हणून ही प्रक्रिया इथल्या स्थानिक ऑलिम्पिक रुग्णालयात सुरु आहे.' तसंच या वेटकट दरम्यान, विनिशचे सर्व पॅरामीटर्स नॉर्मल होते आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ती पूर्णपणे नॉर्मल होती. विनिशनं अलीकडेच IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी बोलत सांगितलं की ती शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सामान्य असली तरी ती निराश आहे. हे तिसरं ऑलिम्पिक आहे आणि तिला अपात्र ठरवावं लागलं.

हेही वाचा :

  1. ...जेव्हा बॉक्सर मेरी कोमनं अवघ्या 4 तासांत 2 किलो वजन केलं होतं कमी; काही मिनिटांत खेळाडू कसं कमी करतात वजन? - vinesh phogat disqualified
  2. ऑलिम्पिकमधून अपात्र झालेल्या विनेशसाठी पंतप्रधान मोदींची भावनिक पोस्ट, म्हणाले... - PM Modi on Vinesh Phogat

Last Updated : Aug 7, 2024, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.