मॉन्ग कॉक (हाँगकाँग) Pakistan Beat India : हाँगकाँगमधील मॉन्ग कॉक इथं सुरु असलेल्या हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 6 षटकांत 119 धावा केल्या, पण तरीही पाकिस्ताननं अवघ्या 30 चेंडूत सामना जिंकला. पाकिस्तानकडून आसिफ अलीनं 14 चेंडूत 55 धावा केल्या. तर अखलाकनं 12 चेंडूत 40 धावांची खेळी केली. भारताकडून भरत चिपलीनं 16 चेंडूत 53 धावांची खेळी केली.
Pakistan emerges victorious in the intense clash against team India, clinching victory by 6️⃣ wickets! 🇵🇰 #HongKong #AsiasWorldCity #Cricket #ItsRainingSixes pic.twitter.com/FM4gquFEAS
— Hong Kong Sixes (@HongKongSixes) November 1, 2024
भरत चिपली-उथप्पा यांची विस्फोटक खेळी : तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतानं 6 षटकांत 119 धावा केल्या. भरत चिपलीनं सर्वाधिक 53 धावांची खेळी खेळली. त्यानं 16 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. कर्णधार रॉबिन उथप्पानंही अवघ्या 8 चेंडूत 31 धावा केल्या. उथप्पानं 3 षटकार आणि 3 चौकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट 387.50 होता. मनोज तिवारीनं 7 चेंडूत 17 धावांची नाबाद खेळी केली. स्पर्धेच्या नियमांनुसार एका सामन्यात 6 खेळाडू खेळू शकतात. तर सामनाही 6-6 षटकांचा आहे.
Bharat Chipli chipped in with a cracking 53 off 16 before he had to retire out according to the #HongKongSixes rules. 💪#HongKongSixesonFanCode #ItsRainingSixes pic.twitter.com/IlePJhuPbP
— FanCode (@FanCode) November 1, 2024
भारतीय संघाचा डाव कसा राहिला :
- पहिलं षटक : भारतानं पहिल्याच षटकात 27 धावा केल्या. आमिर यामीनच्या पहिल्या पाच चेंडूंवर रॉबिन उथप्पानं 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
- दुसरं षटक - फहीम अश्रफच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन उथप्पानं षटकार मारला पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर केदार जाधवनं लागोपाठ 2 चौकार मारले आणि शेवटच्या चेंडूवर मनोज तिवारीने चौकार मारला आणि या षटकात संघाच्या 18 धावा झाल्या.
- तिसरं षटक - पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खाननं शानदार गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा दिल्या.
- चौथं षटक - फहीम अश्रफच्या षटकांत 32 धावा झाल्या. भरत चिपलीनं या षटकात 4 षटकार आणि चौकार लगावले.
- पाचवं षटक - हुसेन तलतच्या षटकात 14 धावा आल्या. मनोज तिवारीनं पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला पण पुढच्या चार चेंडूंवर एकही चौकार लागला नाही.
- सहावं षटक - आसिफ अलीनं पहिल्या तीन चेंडूंवर तीन चौकार मारले. भरत चिपलीनं चौकारांची हॅट्ट्रिक साधत 16 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारतानं शेवटच्या षटकात 20 धावा केल्या आणि भारतीय संघानं निर्धारित 6 षटकात 119 धावा केल्या.
INDIA SMASH 119/2 IN 6 OVERS IN HONG KONG SIXES...!!! 🇮🇳 pic.twitter.com/LHscU9jfaC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2024
पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी :
- पहिलं षटक - पाकिस्तान संघानंही वेगवान सुरुवात केली आणि स्टुअर्ट बिन्नीच्या षटकात 21 धावा केल्या. आसिफ अलीनं दोन षटकार ठोकले. अखलाकनं चौकार मारला.
- दुसरं षटक - दुसऱ्या षटकात पाकिस्ताननं 23 धावा केल्या. केदार जाधवच्या षटकात आसिफ अलीनं 3 षटकार ठोकले.
- तिसरं षटक - शाहबाज नदीमच्या षटकात पाकिस्तानी फलंदाजांनी 24 धावा केल्या. मोहम्मद अखलाकनं या षटकात 3 षटकार आणि एक चौकार लगावला
- चौथं षटक - मनोज तिवारीनंही एका षटकात 20 धावा दिल्या. यावेळी आसिफ अली आणि अखलाक यांनी मिळून 2 षटकार आणि 1 चौकार लगावला.
- पाचवं षटक - आसिफ अलीनं 14 चेंडूत 55 धावा केल्या. शाहबाज नदीमनं या षटकात 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. परिणामी षटकात 33 धावा झाल्या आणि भारतीय संघानं सामना गमावला.
Simply Sublime by Robin Uthappa 🤌
— FanCode (@FanCode) November 1, 2024
Captain Robin got Team India off to a flying start, scoring 31 off 8 balls!#HongKongSixesonFanCode #ItsRainingSixes pic.twitter.com/BZVA5KUuP5
हेही वाचा :