ग्वाल्हेर IND vs BAN 1st T20I Live Streaming : कसोटीनंतर आता भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 6 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना ग्वाल्हेर इथं होणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी, भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा पहिला सामना तुम्ही फ्रीमध्ये कसा पाहू शकता हे जाणून घ्या.
भारताची युवा ब्रिगेड मैदानात : भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत केवळ एकच T20 सामना गमावला असला आणि उर्वरित सामने जिंकण्यात यश मिळविलं असलं, तरी बांगलादेशचा संघ गेल्या काही काळापासून चांगला खेळ करत आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला सावध राहावं लागणार आहे. सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असून हार्दिक पांड्या हा वरिष्ठ खेळाडू म्हणून संघात दिसणार आहे. मात्र, उर्वरित संघ नवीन आणि तरुण असून त्यांना फारसा अनुभव नाही. त्यामुळं, सामना कठीण असू शकतो.
14 वर्षांनी होणार ग्वाल्हेरमध्ये सामना : ग्वाल्हेरमध्ये होणारा पहिला सामनाही महत्त्वाचा ठरतो, कारण इथं तब्बल 14 वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. यापूर्वी 2010 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला होता. सचिन तेंडुलकरनं एकदिवसीय क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावताना हाच सामना होता. त्यानंतर तिथं एकही सामना झाला नसला तरी आता ग्वाल्हेरमध्येही क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.
Gearing 🆙 in Gwalior with radiant rhythm and full flow 👌👌 #TeamIndia hone their fielding skills ahead of the #INDvBAN T20I series opener 🙌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/RjbUb7scXe
— BCCI (@BCCI) October 4, 2024
भारत आणि बांगलादेश यांच्यात हेड-टू-हेड रेकॉर्ड : भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 14 T20 सामने झाले आहेत, त्यापैकी 13 वेळा भारतीय संघानं विजय मिळवला आहे, तर बांगलादेशला केवळ एकदाच भारताचा पराभव करता आला आहे. दोन्ही संघ शेवटच्या T20 विश्वचषकात आमनेसामने आले होते, ज्यात भारतीय संघ जिंकला होता.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना रविवार, 06 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर इथं होणार आहे.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना किती वाजता सुरु होईल?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरु होईल.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर दिसेल.
- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जियो सिनेमा ॲपवर पाहू शकाल.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
भारताचा T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.
बांगलादेश T20 संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमोन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह, लिटन दास, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तस्किन अहमद, शौरीन, मुस्तफिजुर रहमान. हसन साकिब, रकीबुल हसन.
हेही वाचा :