अल अमेरत (ओमान) IND A vs AFG A Live Streaming : भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम एशिया कपचा दुसरा उपांत्य सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंडवर आज खेळवला जाईल. या वर्षी वरिष्ठ संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत, तर 25 ऑक्टोबर रोजी ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तान अ आणि भारत अ एकमेकांना सामोरं जातील.
🚨 Semifinal Alert! 🚨
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 24, 2024
India 'A' and Afghanistan 'A' are all set to clash in Semifinals 2! Get ready for some edge-of-your-seat action!#MensT20EmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/x3XfPMKlHY
भारतीय संघ आतापर्यंत अपराजित : वरिष्ठ संघानं अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा पराभव केलेला नाही, त्यामुळं अफगाणिस्तान अ संघाला शुक्रवारी अल अमेरतमध्ये भारत अ संघाचा पराभव करुन मोठा पराक्रम करायची संधी असेल. मात्र, अफगाणिस्तानसाठी स्पर्धेतील एकमेव अपराजित संघाविरुद्ध विजय मिळवणं सोपं नाही, हे सत्य नाकारता येणार नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाबतीत, काही अफगाण खेळाडू त्यांच्या भारतीय खेळाडूंपेक्षा अनुभवी आहेत, परंतु भारतीयांचा इंडियन प्रीमियर लीगचा अनुभव त्यांना खूप वेगळा बनवतो.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ या संघात आत्तापर्यंत एकही सामना T20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला नाही. मात्र दक्षिण आफ्रिका अ संघाची तिरंगी मालिका 2017 मध्ये भारत अ आणि अफगाणिस्तान अ संघ केवळ दोनदाच आमनेसामने आले आहेत. या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत अ संघानं अनुक्रमे 113 धावा आणि सात गडी राखून विजय मिळवला होता.
भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ सामना कधी आणि कुठं होईल?
भारतीय अ विरुद्ध अफगाणिस्तान अ क्रिकेट संघ यांच्यात दुसरा उपांत्य सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंड इथं संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठं पहावं?
ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कपचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत, जे त्यांच्या टीव्ही चॅनल स्टार स्पोर्ट्स 1 वर भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ दुसऱ्या उपांत्य सामन्याचं थेट प्रक्षेपण प्रदान करेल. तसंच चाहते डिस्नी+ हॉटस्टार आणि फॅनकोड ॲप वेबसाइटवर भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11 :
भारत अ क्रिकेट संघ : अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (कर्णधार), नेहल वढेरा, आयुष बडोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, राहुल चहर, अंशुल कंबोज, वैभव अरोरा, रसिक सलाम.
अफगाणिस्तान अ क्रिकेट संघ : सेदीकुल्लाह अटल, वफीउल्लाह तरखिल, दरविश रसूली (कर्णधार), नुमान शाह (यष्टीरक्षक), शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, नांगेयालिया खरोटे, करीम जनात, कैस अहमद, अब्दुल रहमान, फरीदून दाऊदझाई.
हेही वाचा :