ETV Bharat / sports

IND vs ENG 4th Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंड 302/7; जो रूटनं ठोकलं शतक - भारत आणि इंग्लंड

IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्सवर खेळला गेला. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडच्या संघानं पहिल्या दिवशी सात गडी गमावून 90 षटकांत 302 धावा केल्या होत्या. जो रूटनं त्याच्या कारकिर्दीतील 31 वं कसोटी शतकही पूर्ण केलं आहे. रूटनं 106 तसंच ऑली रॉबिन्स 31 धावा करून नाबाद राहिला.

IND vs ENG 4th Test
IND vs ENG 4th Test
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 9:16 AM IST

Updated : Feb 23, 2024, 5:14 PM IST

रांची IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडनं पहिल्या दिवशी सात गडी गमावत 90 षटकांत 302 धावा केल्या. तसंच जो रूटनं त्याच्या कारकिर्दीतील 31 वं कसोटी शतकही पूर्ण केलं. यावेळी रूट 106 आणि ऑली रॉबिन्सन 31 धावा करून नाबाद परताल.

आकाशदीपनं घेतले सर्वाधिक 3 बळी : जो रूट तसंच बेन फोक्स यांनी दुपारच्या जेवानंतर (112/5) इंग्लंडचा डाव पुढं नेला. चहापानाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडनं 5 विकेट गमावून 198 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बेन फॉक्स आक्रमक दिसला, मात्र मोहम्मद सिराजनं त्याला (47) धावांवर बाद केलं. त्यानंतर सिराजनेच भारताला सातवी विकेट मिळवून दिली. भारतानं या इनिंगचे सर्व रिव्ह्यू गमावले आहेत. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या आकाशदीपनं सर्वाधिक 3 बळी घेतले, तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 यश मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बेन डकेट, जॅक क्रॉलीनं इंग्लंडच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, आकाशदीपचा भेदक गोलंदाजीपुढं इंग्लडच्या फलंदाजांना टिकाव धरता आला नाही.

आकाशदीपनं मिळवून दिलं भारताला पहिलं यश : या सामन्यात पदार्पण करणाऱ्या आकाशदीपनं चांगली कामगिरी केलीय. प्रथम, त्यानं डावाच्या 10व्या षटकात बेन डकेट (11) याला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिलं. त्यानंतर त्याच षटकात त्यानं ऑली पोप (0)लाही बाद केलं. या धक्क्यातून सावरत असतानाच आकाशदीपनं डावाच्या 12व्या षटकात जॅक क्रॉलीला (42) धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर अश्विननं जॉनी बेअरस्टोला (38) धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केलं. जेवणापूर्वी रवींद्र जडेजानं इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्सला एलबीडब्ल्यू (3) बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

नाणेफेक जिंकून साहेबांची प्रथम फलंदाजी : या कसोटीत इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतीय संघाकडून आकाश दीप या युवा वेगवान गोलंदाजानं कसोटीत पदार्पण केलंय. तर इंग्लंड संघात दोन बदल करण्यात आलेत.

इंग्लंडनं मालिकेत विजयानं केली सुरुवात : इंग्लंडनं भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची सुरुवात विजयानं केली होती. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला होता. ज्यात पाहुण्या साहेबांनी 28 धावांनी विजय मिळवला. पण त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं विशाखापट्टणम इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी शानदार विजय मिळवला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. यानंतर राजकोट इथं खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतानं इंग्लंडचा 434 धावांनी विक्रमी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलीय.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज
  • इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टिरक्षक), टॉम हार्टली, शोएब बशीर, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन

हेही वाचा :

  1. रांची कसोटीसाठी साहेबांच्या 'प्लेइंग इलेव्हन'ची घोषणा; 'या' दिग्गज गोलंदाजाचं संघात पुनरागमन
  2. 'संघासह इंग्लंडला परत जा नाहीतर...'; रांचीतील चौथा कसोटी सामना रद्द करण्याची खलिस्तानी 'पन्नू'ची धमकी

Last Updated : Feb 23, 2024, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.