नवी दिल्ली IND vs BAN T20I Series : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाच्या कसोटी हंगामाची सुरुवात या मालिकेनं होणार आहे. या हंगामात भारतीय संघाला एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर टी 20 मालिकाही खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने होणार आहेत. या मालिकेबाबत एक मोठं अपडेट समोर आले आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. गोलंदाज जसप्रित बुमराह आणि शुभमन गिल जो कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळतो आणि संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे, यांना विश्रांती देण्यात येणार असल्याचं समोर आलंय.
Shubman Gill is set to be rested for the T20I series against Bangladesh for managing the Workload ahead of the New Zealand Test series. [PTI] pic.twitter.com/SpDPpo2JLN
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2024
टी 20 मालिकेत विश्रांती : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांनाही सामोरं जावं लागणार आहे. अशा परिस्थितीत, रिपोर्ट्सनुसार, वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता, शुभमन गिलला टी 20 मालिकेत विश्रांती दिली जाईल, कारण तो या हंगामात सर्व 10 कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे. कसोटी फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह गिल संघाच्या टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचा खेळाडू आहे.
UPDATES OF INDIAN TEAM FOR BANGLADESH T20I series. [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2024
- Gill is likely to be rested.
- Bumrah & Siraj will be given rest.
- If Pant is rested then there is a possibility of Ishan Kishan returning to the India team. pic.twitter.com/O5ZPW8DRGC
काय आहे कारण : 7 ऑक्टोबरपासून बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, 'होय, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शुभमन गिलला विश्रांती दिली जाईल.' सामन्यांच्या तारखांवर नजर टाकल्यास 7, 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी तीन टी-20 सामने खेळवले जातील. यानंतर 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरु होईल. त्यामुळं तीन दिवसांचं अंतर लक्षात घेता गिलला विश्रांती देणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :