बांगी (मलेशिया) ICC Mens T20 World : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा विक्रम होतात आणि मोडले जातात. अनेक वेळा तर असे सामने बघितले जातात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. असाच एक आश्चर्यकारक सामना मलेशियातील बांगी इथं पाहायला मिळाला. ICC T 20 विश्वचषक आशिया क्वालिफायर A चा 14 वा सामना बांगीच्या मैदानावर खेळला गेला. ज्यात मंगोलियन संघ अवघ्या 10 धावांत गारद झाला. हा टी-20 सामना होता. पण, मंगोलियाच्या संघाला 10 षटकांत 10 धावा करता आल्या आणि प्रत्युत्तरात सिंगापूरनं अवघ्या 5 चेंडूत सामना जिंकला. मात्र, यात एक विकेटही पडली. या संपूर्ण सामन्यात हर्ष भारद्वाज नावाच्या भारतीय वंशाच्या 17 वर्षीय गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं आणि या खेळाडूनं अवघ्या 3 धावांत 6 बळी घेतले.
Historic Low in T20I Cricket 🚨
— Berzabb (@Berzabb) September 5, 2024
Mongolia 🇲🇳 has equaled the record for the lowest total in men's T20I history, scoring just 10 runs against Singapore 🇸🇬 in the 2026 T20 World Cup qualifier.
Mongolia: 10/10 (10 overs)
Singapore: 13/1 in just 0.5 overs#mangolia pic.twitter.com/s2jiu4UlIJ
हर्ष भारद्वाजचा चमत्कार : हर्ष भारद्वाज हा लेगस्पिनर आहे, तरीही सिंगापूरचा कर्णधार मनप्रीत सिंगनं त्याला पहिल्या षटकात गोलंदाजी दिली. हर्षनं आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत, आपल्या 4 षटकात केवळ 3 धावा दिल्या. या खेळाडूनं 6 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे पॉवरप्लेपूर्वीच मंगोलियानं 7 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या आणि हर्षनं आपल्या डावातील पाच विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
मंगोलियाची लाजिरवाणी फलंदाजी : मंगोलियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. पाच फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. संघाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती 2 धावा. त्यामुळं संपूर्ण संघ 10 धावांत गडगडला. जर आपण T20 मध्ये सर्वात कमी T20 बद्दल बोललो तर मंगोलिया आता अव्वल स्थानावर आहे. 10 षटकांत 10 धावा करणारा मंगोलिया हा पहिला संघ आहे. तत्पूर्वी, आयल ऑफ मॅन संघ देखील 10 धावांवर बाद झाला होता, तो संघ 8.4 षटकांत सर्वबाद झाला होता. अर्थात, कोणत्याही T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी धावगतीचा विक्रमही मंगोलियाच्या नावावर झाला आहे. मंगोलियाच्या संघाची फलंदाजी नेहमीच खूपच खराब झाली आहे. यंदा हा संघ जपानविरुद्ध 12 धावांत ऑलआऊट झाला.
हेही वाचा :