मुंबई IND vs IRE : दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारत-आयर्लंड यांच्यातील आजच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा विजय मिळाला मिळाला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकांत 7 बाद 301 धावा केल्या. खडतर आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडला अवघ्या 100 धावा करता आल्या. या सामन्यात भारतानं 201 धावांनी विजय मिळवला.
मुशीरनं आयर्लंडच्या गोलंदाजांना धुतलं : ब्लोमफॉन्टेन येथे झालेल्या सामन्यात आयर्लंडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचा फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला. आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी झटपट बाद झाले. पण त्यानंतर मुशीर खान, कर्णधार उदय सहारन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 151 चेंडूत 156 धावांची भागीदारी रचली. उदय 75 धावा करून बाद झाला. मुशीरनं आयर्लंडच्या गोलंदाजांना ठोकत शतक झळकावलं. अरसेली अविनाशनं 22 आणि सचिन धसने 21 धावा केल्या. आयर्लंडकडून ऑलिव्हर रिलेनं 3 बळी घेतले.
आयर्लंडला 302 धावांचं आव्हान : मुशीर खाननं भारताकडून सर्वाधिक 118 धावांचं शतक झळकावलं. त्यानं 106 चेंडूत 4 षटकार, 9 चौकारांच्या मदतीनं 118 धावा केल्या. याशिवाय कर्णधार उदय सहारननं 75 धावांची सावध खेळी केली. सांघिक खेळाच्या जोरावर भारतानं आयर्लंडला विजयासाठी 302 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाची निराश झाली. डॅनियल फोर्किनच्या 27 धावा वगळता एकाही आयरिश फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. अखेरीस आयर्लंडनं 29.4 षटकांत 100 धावा केल्या. त्यामुळं त्यांना हा सामना मोठ्या फरकानं गमावावा लागला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडताना भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून नमन तिवारीनं सर्वाधिक (4) विकेट घेतल्या, तर सौम्य पांडे (3) धनुष गौडा (1), अभिषेक आणि उदय सहारन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे वाचलंत का :