बेंगळुरु How To Buy IND vs NZ 1st Test Match Tickets : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबर (बुधवार) पासून बेंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 साठी अंतिम पात्रता सुरु असताना, भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर या बातमीत मिळेल.
📍 Bengaluru
— BCCI (@BCCI) October 14, 2024
The preps have begun for the #INDvNZ Test Series 💪#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/z4d8WjzwGv
न्यूझीलंडची अग्निपरीक्षा : एकिकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बांगलादेशवर 2-0 नं शानदार विजय मिळवून प्रवेश करेल आणि घरच्या मैदानावर आणखी एक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे भारताच्या विपरीत, न्यूझीलंड या मालिकेत थोड्या खराब फॉर्मसह उतरणार आहे, कारण त्यांना कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला आहे. गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटीत किवी फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकीपटूंना कसं सामोरं जावं हे अजिबात समजलं नाही. जर किवींना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आव्हान द्यायचं असेल तर त्यांना खूप चांगला खेळ करावा लागेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघानं 22 सामने जिंकले. तर न्यूझीलंडनं 13 सामने जिंकले आहेत. याशिवाय 27 कसोटी सामना अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळताना भारतानं 17 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝘃𝘀 𝗡𝗲𝘄 𝗭𝗲𝗮𝗹𝗮𝗻𝗱
— BCCI (@BCCI) October 15, 2024
𝘛𝘩𝘦 𝘗𝘳𝘦𝘭𝘶𝘥𝘦 𝘣𝘺 𝘙 𝘈𝘴𝘩𝘸𝘪𝘯#TeamIndia 🇮🇳 is back in whites 🤍
One sleep away from Test No.1#INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ashwinravi99 pic.twitter.com/lzVQCrtaLh
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 16 ते 20 ऑक्टोबर (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू)
- दुसरी कसोटी - 24 ते 28 ऑक्टोबर (एमसीए स्टेडियम, पुणे)
- तिसरी कसोटी - 1 ते 5 नोव्हेंबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
कसं करायचं तिकिट बुक : ज्या चाहत्यांना बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना पाहायचा आहे, ते Insider.in वर ऑनलाइन तिकिटं खरेदी करु शकतात. या तिकिटांची किंमत 600 रुपयांपासून सुरु होईल जे रेल्वेच्या एसी तिकिटापेक्षाही कमी दरात आहे. तसंच यात 2000 रुपये, 3000 रुपये आणि 7500 रुपयांचा समावेश आहे. तथापि, ऑफलाइन तिकिटं कशी खरेदी करता येतील याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. तरी सामना सुरु होण्याआधी ऑफलाईन तिकिट विक्री सुरु होण्याची शक्यता आहे.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सियर्स , ईश सोधी, टिम साउथी, केन विल्यमसन आणि विल यंग.
हेही वाचा :