हैदराबाद Mohammad Siraj DSP : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची तेलंगणात पोलीस महासंचालक (DGP) यांच्या देखरेखीखाली पोलीस उपअधीक्षक (DSP) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी डीजीपी कार्यालयात इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तेलंगणाचे पोलीस महासंचालक जितेंद्र यांची भेट घेतल्यानंतर सिराजनं औपचारिकपणे पदभार स्वीकारला. तेलंगणाचे पोलीस महासंचालक जितेंद्र यांनी शुक्रवारी हैदराबाद येथील डीजीपी कार्यालयात भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती पत्र सुपूर्द केलं.
DSP MOHAMMAD SIRAJ..!!! 🫡
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024
Many congratulations to Mohammad Siraj on assuming charge as 'DSP'. 👏🇮🇳 pic.twitter.com/igW8TcbwuS
तेलंगणा सरकारनं केली घोषणा : वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस इथं झालेल्या T20 विश्वचषकात भारताच्या विजयात हातभार लावल्यानंतर सिराज हैदराबादेत परतल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी त्याला बक्षीसासह एक भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. यानंतर रेवंत रेड्डी यांनी आपलं वचन पूर्ण करत मोहम्मद सिराजची नियुक्ती केली आहे. सिराजचा सध्या भारतातील पहिल्या तीन वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश आहे आणि तो भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यापासून, सिराजने त्याच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा केली आहे.
मोहम्मद सिराजला किती मिळेल पगार? : इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणा पोलिसांमध्ये DSP ची वेतनश्रेणी 58850 रुपये ते 137050 रुपये आहे. या वेतनश्रेणीसोबतच मोहम्मद सिराजला डीएसपींना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधाही मिळणार आहेत. त्याला सरकारकडून घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता यासह इतर सुविधाही मिळतील.
DSP MOHAMMAD SIRAJ ON DUTY. 🫡🇮🇳 pic.twitter.com/Vn39mq5T5G
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
सिराज क्रिकेटमधून किती कमावतो? : मोहम्मद सिराज IPL आणि BCCI कडून क्रिकेटमध्ये कमाई करतो. BCCI नं सिराजला A ग्रेडमध्ये ठेवलं आहे. याआधी तो B ग्रेडमध्ये होता. ग्रेड A मध्ये पोहोचल्यानंतर त्याचा पगार वार्षिक 5 कोटी रुपये झाला. याशिवाय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचे सामने खेळण्यासाठी त्याला वेगवेगळं मानधन दिलं जातं. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मोहम्मद सिराजला त्यांच्या फ्रँचायझीमध्ये 7 कोटी रुपयांमध्ये सामील केलं होतं, फ्रँचायझी त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते. या सर्वांसोबतच मोहम्मद सिराजला DSP झाल्यानंतर तेलंगणा सरकारकडून पगारही मिळणार आहे.
सिराजची कामगिरी कशी : T20 वर्ल्ड चॅम्पियन सिराजच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं भारतासाठी 29 कसोटींमध्ये 78 तर 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 आणि 16 T20 मध्ये 14 बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत सिराजनं दुसऱ्या कसोटीत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा :