मुंबई Happy Birthday Anil kumble : भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आज 17 ऑक्टोबर रोजी 54 वर्षांचा झाला. अनिल कुंबळेचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 रोजी बंगळुरुमध्ये झाला. कुंबळेनं आपल्या जादुई गोलंदाजीनं भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त अशा काही कामगिरीचा उल्लेख करणार आहोत, ज्यामुळं क्रिकेटच्या पानांवर इतिहास लिहिला गेला.
4⃣0⃣3⃣ intl. games 👍
— BCCI (@BCCI) October 17, 2021
9⃣5⃣6⃣ intl. wickets 👌
Only the second bowler in Test cricket to scalp 10 wickets in an innings 👏
Wishing former #TeamIndia captain @anilkumble1074 a very happy birthday. 🎂 👏
Let's revisit his brilliant 1⃣0⃣-wicket haul against Pakistan 🎥 🔽 pic.twitter.com/BFrxNqKZsN
एकाच डावात घेतल्या 10 विकेट : अनिल कुंबळेनं 7 फेब्रुवारी 1999 रोजी 22 यार्डच्या खेळपट्टीवर असा पराक्रम केला की त्याची इतिहासात नोंद झाली. 25 वर्षे झाली तरी तो सामना क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. अनिल कुंबळेनं पाकिस्तानला इतकी वेदना दिली होती की, तो अजूनही पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिवंत आहे. पाकिस्तानविरुद्ध एकाच डावात 10 बळी घेण्याचा महाविक्रम केला होता. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर (आताचं अरुण जेटली स्टेडियम) पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कुंबळेनं सर्व 10 बळी घेतले. त्याच्या दमदार कामगिरीमुळं चेन्नईतील मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतानं दिल्लीत बरोबरी साधली. कुंबळेनं 74 धावा देऊन सर्व विकेट घेतल्या होत्या.
तुटलेल्या जबड्यानं उतरला मैदानात : 2002 साली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत होता. वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात अनिल कुंबळेनं 14 षटकं टाकली आणि पहिल्या डावात केवळ 29 धावा दिल्या. यादरम्यान, तुटलेल्या जबड्यानं गोलंदाजी करताना त्यानं महान फलंदाज ब्रायन लाराची विकेट घेतली, जो 25 चेंडूत केवळ 4 धावा काढून बाद झाला. अशा प्रकारे कुंबळेनं देशभक्तीचा आदर्श घालून दिला होता.
- 619 Test wickets.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 16, 2024
- 337 ODI wickets.
- 35 Five wicket hauls in Tests.
- A Test century at the Oval.
- Only Asian with 10 wickets in an innings.
- Most Test wickets for India.
- Most ODI wickets for India.
HAPPY BIRTHDAY TO ONE OF INDIA'S GREATEST MATCH WINNER - ANIL KUMBLE. pic.twitter.com/QUlCch8HBg
कसोटी क्रिकेटमध्ये 600 हून अधिक बळी : अनिल कुंबळेची गणना भारतातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये केली जाते. त्यानं 132 कसोटीत 619 विकेट घेतल्या. कसोटीत 600 बळींचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यात त्यानं 38 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्येही शतक आहे. जर आपण ODI क्रिकेटबद्दल बोललो तर त्यानं 271 ODI मध्ये 337 विकेट घेतल्या आहेत.
अनिल कुंबळेची संपत्ती किती : अनिल कुंबळेची संपत्ती 80 कोटींच्या पुढे गेली आहे. BCCI कडून मिळणारा पगार, मान्यता, आयपीएल करार आणि वैयक्तिक व्यवसाय हा त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याच्याकडं बेंगळुरुमध्ये एक आलिशान घर आहे आणि देशभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता देखील आहेत.
हेही वाचा :