नवी दिल्ली Paris Olympics 2024 Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होत आहेत. भारताने आतापर्यंत तीन पदकं जिंकली आहेत. तिनंही पदक नेमबाजीत मिळाली आहेत. मात्र, संपूर्ण देशाला अजूनही पहिल्या सुवर्णपदकाची प्रतीक्षा आहे.
Mohak Nahta, CEO of Atlys, has promised free visas to everyone if Chopra manages to win gold. Nahta made thịs announcement on LinkedIn, saying, " i will personally send a free visa everyone if neeraj chopra wins a gold at the olympics. let's go," the postread. pic.twitter.com/kRRN7FKI05
— DR.ASHVIN PATEL 🇮🇳 (@addhamsaniya007) August 4, 2024
भारताचा स्टार खेळाडू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. यावेळीही संपूर्ण देशाला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. भारतीय वंशाच्या सीईओने जगभरातील लोकांना एक अप्रतिम ऑफर देण्याची घोषणा केली आहे.
Neeraj Chopra practicing hard!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 3, 2024
- Everyone is waiting for 8th August to see Neeraj in action. 🇮🇳pic.twitter.com/thRevK21dU
मोफत व्हिसा मिळणार : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील ऑनलाइन व्हिसा ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म कंपनी ॲटलसचे संस्थापक आणि सीईओ मोहक नाहाटा यांनी सोशल मीडियात पोस्ट करून अनोखी ऑफर दिली आहे. "नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास कंपनी सर्व लोकांना एक दिवसाचा मोफत व्हिसा देईल," असं ते म्हणाले. लिंक्डइनवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये मोफत अटीसह शर्तींची तपशीलवार माहिती दिली आहे. पोस्टमध्ये लिहिलं की, "यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक कोणत्याही एका देशासाठी विनामूल्य व्हिसा निवडू शकतात. यासाठी एकच अट आहे की, नीरज चोप्रा सुवर्णपदक जिंकलं पाहिजे."
" neeraj chopra: time to rewrite history once again! 🔥
— Mr. RP (@ranjitp5252) August 3, 2024
all eyes are on the first #GOLD of this #ParisOlympics2024
Let's Cheer for Him, India 🇮🇳
Our Hopes are Sky-High! 🥹 🙌 pic.twitter.com/HpI7CCkb6K
ऑफरचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल ? : सीईओ मोहक नाहटा यांनी सांगितलं की, "या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपला ईमेल पत्ता कमेंटमध्ये शेअर करावा. कंपनी ईमेलद्वारे मोफत व्हिसा क्रेडिटसाठी खाते तयार करेल." कंपनीच्या या ऑफरमुळे लोकांमध्ये उत्साह वाढला. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नीरज चोप्राचा पॅरिसमध्ये कधी होणार सामना : नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही नीरज सुवर्णपदक जिंकेल, अशी आशा भारतीयांना आहे. भालाफेक स्पर्धेत नीरजसोबत भारतातील किशोर जेनाही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची पात्रता फेरी 6 ऑगस्टला आणि अंतिम फेरी 8 ऑगस्टला होणार आहे. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यास असं यश मिळविणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
हेही वाचा
- स्टार शटलर सेनचं सुवर्ण 'लक्ष्य' हुकलं; मात्र इतिहास रचण्यासाठी हवा एक 'विजय' - Paris Olympics 2024
- भारतीय हॉकी संघाचं विजयी 'शूट-आउट'; पदकापासून फक्त एक विजय दूर - Paris Olympics 2024
- पहिला सामना टाय झाल्यानंतर कोण घेणार मालिकेत आघाडी? दुसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघात मोठे बदल - SL vs IND 2nd ODI
- 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा कधी फेकणार पॅरिसमध्ये 'भाला'? कसा बघणार लाईव्ह सामना - Paris Olympics 2024