नवी दिल्ली Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं (ACB) बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय कसोटी सामन्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
ACB name R. Sridhar as National Team’s Asst. Coach for New Zealand and South Africa Fixtures.
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 21, 2024
More: https://t.co/B8VZlnB10t pic.twitter.com/nmCuVpCqD9
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं केली घोषणा : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या घोषणेनुसार, 'अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं भारतीय रामकृष्णन श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय कसोटी सामन्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.' 54 वर्षीय श्रीधर, ज्यांनी ऑगस्ट 2014 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत 7 वर्षे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे, त्यांनी भारतीय देशांतर्गत सर्किटमध्ये 35 प्रथम श्रेणी आणि 15 लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि त्यांना खेळाची सखोल माहिती आहे. दोन आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि दोन टी 20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकांसह 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीधर भारताच्या कोचिंग स्टाफमधील एक प्रमुख सदस्य होते.
R. Sridhar has been named as Afghanistan's assistant coach for the New Zealand and South Africa series. pic.twitter.com/XvrMYmi4dU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 21, 2024
अनेक वर्षे राहिले प्रशिक्षक : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) सोबतच्या त्याच्या कार्यकाळामुळं त्यांचं कोचिंग क्रेडेन्शियल्स आणखी वाढलं. जिथं त्यांनी 2014 ते 2017 या काळात फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलं. उल्लेखनीय म्हणजे, पंजाबनं 2014 मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. याव्यतिरिक्त, श्रीधरनं भारतीय अंडर 19 राष्ट्रीय संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत भारताच्या युवा क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. 2008 ते 2014 या काळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहाय्यक क्षेत्ररक्षण आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.
हेही वाचा :
- नाव मोठं लक्षण खोटं... वनडे क्रिकेटमधल्या अव्वल फलंदाजाचा दोन चेंडूत खेळ खल्लास, कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहावा लागला 'हा' दिवस - PAK vs BAN
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाता येईलं? वाचा एका क्लिकवर - pak vs ban live streaming in india
- जय शाह होणार जागतिक 'क्रिकेटचे बॉस'? विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चांना उधाण - Jay Shah ICC Chairman