किंग्सटन (जमैका) Firing in Live Match : फुटबॉल जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. करेबियन देश जमैकामध्ये एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अनेक वेळा चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात आपापसात भांडतात, अशी घटना अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. पण प्लेजंट हाइट्स, रॉकफोर्ट, किंग्स्टन इथं एका फुटबॉल सामन्यादरम्यान अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. यादरम्यान 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात 48 तासांचा संचारबंदी लागू केली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण क्रिडा विश्व हादरुन गेलं आहे.
लाइव्ह मॅचमध्ये 5 जणांची गोळ्या झाडून हत्या :
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी किंग्स्टनच्या रॉकफोर्टमधील प्लेझंट हाइट्समध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला. किंग्स्टन इस्टर्नचे पोलिस प्रमुख अधीक्षक टॉमी चेंबर्स यांनी सांगितलं की, गोळीबाराची घटना रात्री 8 वाजता घडली. जमैका कॉन्स्टेब्युलरी फोर्सची माहिती शाखा कॉन्स्टेब्युलरी कम्युनिकेशन्स युनिटनंही या घटनेची पुष्टी केली. त्याचबरोबर या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.
Five men were shot and killed and several others sustained injuries during an incident at a football match in Pleasant Heights, Rockfort, Kingston earlier this evening, as reported by law enforcement authorities.
— Jamaica Live (@JamaicaLivenews) October 22, 2024
Unconfirmed reports suggested that two of the men are alleged dons… pic.twitter.com/1P5tbYWDcO
प्लेझेंट हाइट्स पूर्वी वारेका हिल्स म्हणून ओळखलं जात होतं. किंग्स्टन ईस्टर्न डिव्हिजनचे अधीक्षक टॉमीली चेंबर्स यांनी सांगितलं की, "सात लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि पाच जणांचा मृत्यू झाला." याशिवाय पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात 48 तासांचा संचारबंदी लागू केली आहे.
पोलिसांना टोळीयुद्धाचा संशय :
अधीक्षक चेंबर्स म्हणाले की ही ताजी घटना कोणत्याही टोळीयुद्धाशी संबंधित आहे की नाही हे ठरवणं खूप घाईचं आहे. ते म्हणाले, 'रॉकफोर्ट समुदायात दोन वर्षांहून अधिक काळ शांतता आहे.' आम्ही तुम्हाला सांगतो की, वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटर ख्रिस गेलचा जन्मही जमैकाच्या किंग्स्टनमध्ये झाला होता. क्रिकेट जगतात जमैकाला फक्त ख्रिस गेलमुळंच ओळखलं जातं.
हेही वाचा :