लंडन Ben Stokes : इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला 'द हंड्रेड क्रिकेट लीग'मध्ये खेळताना डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळं उर्वरित क्रिकेटमधून बाहेर काढण्यात आलं आहे. रविवारी नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि मँचेस्टर ओरिजिनल्स यांच्यातील सामन्यादरम्यान स्टोक्सला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरच्या स्कॅनमुळं त्याला पुढील आठवड्यापासून श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या अधिकृत निवेदनात बोर्डानं पुष्टी केली की, इंग्लंडचा कर्णधार ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यापासून पुन्हा परत येऊ शकतो.
Wishing you all the best in your recovery, Ben 👊
— England Cricket (@englandcricket) August 13, 2024
बेन स्टोक्स श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतून बाहेर : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स रविवारी 'द हंड्रेड'मध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळं उर्वरित स्पर्धेसाठी बाहेर पडला आहे. मंगळवारी लीड्समध्ये घेतलेल्या स्कॅनमुळं स्टोक्सला बुधवार, 21 ऑगस्टपासून एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड इथं सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या रोथेसे कसोटी मालिकेतून वगळण्यात येईल. या मालिकेसाठी संघात कोणताही नवा खेळाडू असणार नाही. यानंतर बेन स्टोक्सचं पाकिस्तानला परतण्याचं उद्दिष्ट आहे, असं ईसीबीने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. ही मालिका ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दौऱ्यात मुलतान, कराची आणि रावळपिंडी येथील तीन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. बेनच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा फलंदाज ओली पोप संघाचं नेतृत्व करेल.
Ben Stokes ruled out for the remainder of the English summer. (Sky Sports). pic.twitter.com/Kfj66DUrgk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 13, 2024
ऑली पोप इंग्लंडचा नवा कर्णधार : स्टोक्सच्या अनुपस्थितीत ओली पोपकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं असून तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लिश संघाचं नेतृत्व करण्याच्या तयारीत असल्यानं त्याला 'द हंड्रेड'मध्ये कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. स्टोकची दुखापत हा इंग्लंडसाठी मोठा धक्का असेल कारण एक अष्टपैलू म्हणून तो फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील योगदान देत होता. गेल्या वर्षी त्याची गोलंदाजी मर्यादित होती. पण नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रियेनंतर तो उत्कृष्ट गोलंदाजीसह परतला. त्यानं काउंटी चॅम्पियनशिपमध्ये 18 विकेट घेतल्या आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही त्यानं प्रभावी कामगिरी केली. मात्र, 'द हंड्रेड' सामन्यात झटपट एकेरी घेतल्यानं त्याला दुखापत झाली.
हेही वाचा :