मुलतान Highest Total in Test Cricket : कसोटी क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे, पण 147 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ चार वेळा 800 पेक्षा जास्त धावसंख्या झाली आहे. यापैकी एकट्या इंग्लंड संघानं तीन वेळा हा चमत्कार केला आहे. श्रीलंकेच्या संघानं एकदाच 800 चा टप्पा ओलांडला आहे, पण 900 पेक्षा जास्त धावा (952/6d) करुन विश्वविक्रम करणारा श्रीलंका हा एकमेव संघ आहे. त्याचवेळी 1997 नंतर इंग्लंडनं पुन्हा 800 धावांचा टप्पा पार करत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. मुलतानमधील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पाकिस्तानविरुद्ध 823/7 धावांवर पहिला डाव घोषित केला.
HARRY BROOK MISSED BRIAN LARA'S ALL TIME RECORD BY JUST 83 RUNS...!!! 🤯 pic.twitter.com/tQrJZJoWOP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उभारला धावांचा हिमालय : या सामन्यात पाकिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करत 149 षटकांत सर्व गडी गमावून 556 धावा केल्या, तर इंग्लंडनं फक्त एकच षटक जास्त खेळला म्हणजेच 150 षटके फलंदाजी केली आणि 823 धावांवर 7 गडी गमावून डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडकडे आता 267 धावांची आघाडी आहे. या सामन्यात अजून 130 षटकं बाकी आहेत. जर इंग्लंडनं पाकिस्तानला 267 धावांच्या आधी ऑल आऊट केलं तर इंग्लंड डावानं विजय मिळवेल.
ENGLAND DECLARED AT 823/7.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
- The number will haunt Pakistan and their fans for a long time! pic.twitter.com/GoOwX9WHzc
सात खेळाडूंनी केली गोलंदाजी : इंग्लंडच्या डावात पाकिस्ताननं एकूण सात गोलंदाजांचा वापर केला, ज्यात सहा गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त धावा दिल्या. यात अबरार अहमदनं सर्वाधिक षटकं टाकली आणि सर्वाधिक धावाही दिल्या. अबरारनं 35 षटकांत 174 धावा दिल्या. मात्र, तापामुळं अबरार चौथ्या दिवशी खेळला नाही. यापूर्वी, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात कसोटी डावात 6 गोलंदाजांनी 100 हून अधिक धावा दिल्या होत्या. 2004 मध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या 6 गोलंदाजांनी 100 हून अधिक धावा दिल्या होत्या. या सामन्यातही झिम्बाब्वेनं सात गोलंदाजांचा वापर केला.
Just for the 4th time in Test cricket:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
A team has scored 800 in an innings! pic.twitter.com/V7PMuXPrrZ
पाकिस्तानविरुद्ध सर्वात जलद त्रिशतक : इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या अर्ध्या धावा हॅरी ब्रूक आणि जो रुट या दोनच फलंदाजांनी केल्या. हॅरी ब्रूकनं कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. त्यानं 322 चेंडूत 317 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही फलंदाजाचं हे सर्वात जलद त्रिशतक आहे. जो रुटनं 262 धावा केल्या. त्याचं हे सहावं द्विशतक आहे.
कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या :
- 952/9 D - श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, 1997
- 903/7 D - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, 1938
- 849 - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन, 1930
- 823/7 D - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024*
- 790/3 D - वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान, किंग्स्टन, 1958
Declaration made with a 267 run lead 👋
— England Cricket (@englandcricket) October 10, 2024
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/K6jp3MCj5H
कसोटीत सर्वात वेगवान त्रिशतक (चेंडूंच्या बाबतीत) :
- 278 - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, 2008
- 310 - हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024*
- 362 - मॅथ्यू हेडन विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ, 2003
- 364 - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2004
पाकिस्तानविरुद्ध कसोटीत त्रिशतक झळकावणारे फलंदाज :
- 365* - गॅरी सोबर्स (वेस्ट इंडीज), किंग्स्टन, 1958
- 335* - डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), ॲडलेड, 2019
- 334* - मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया), पेशावर, 1998
- 309 - वीरेंद्र सेहवाग (भारत), मुलतान, 2004
- 300* - हॅरी ब्रूक (इंग्लंड), मुलतान, 2024*
Career-best efforts from Joe Root and Harry Brook in a record stand put England in command in Multan 👏#WTC25 | #ENGvPAK 📝: https://t.co/E7pVMrxfk2 pic.twitter.com/ZgZKGPk8yD
— ICC (@ICC) October 10, 2024
इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारे फलंदाज :
- 364 - लिओनार्ड हटन विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, 1938
- 336* - वॅली हॅमंड वि न्यूझीलंड, ऑकलंड, 1933
- 333 - ग्रॅहम गूच विरुद्ध भारत, लॉर्ड्स, 1990
- 325 - अँडी सँडम विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन, 1930
- 310* - जॉन एडरिच विरुद्ध न्यूझीलंड, लीड्स, 1965
- 300* - हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024*
जेव्हा 6 गोलंदाजांनी कसोटीच्या 1 डावात 100 पेक्षा जास्त धावा दिल्या :
- झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका, बुलावायो, 2004
- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, मुलतान, 2024
THE 2ND FASTEST TRIPLE CENTURY IN TEST HISTORY. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
- Harry Brook reached his 300 with 97.41 Strike Rate. 🤯 pic.twitter.com/knYkZg6fgS
कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या (दोन्ही संघ एकत्रित) :
- 1489 धावा: श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, 1997
- 1409 धावा: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कराची, 2009
- 1379 धावा: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, मुलतान, 2024*
- 1349 धावा: वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, 2009
- 1349 धावा: श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, 2009
हेही वाचा :