मँचेस्टर ENG vs SL Test Milan Rathnayake : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा क्रिकेट संघ अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहे. इंग्लंडच्या भूमीवर खेळताना श्रीलंकेच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के बसले आणि संघ एकेकाळी खूप अडचणीत असल्याचं दिसून आलं. मात्र, युवा खेळाडू मिलन रत्नायकेनं आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सर्वांचं लक्ष वेधून घेत श्रीलंकेला संकटातून बाहेर काढलं. यासह त्यानं एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. (england cricket team vs sri lanka national cricket team players)
Milan Rathnayake goes into the record books on his Test debut 👏 #ENGvSL pic.twitter.com/jzxsHKTVDM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 21, 2024
संधूचा विक्रम मोडला : रत्नायकेनं आपल्या खेळीनं 41 वर्षे जुना विक्रम मोडला. पदार्पणाच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानं या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू बलविंदर संधूचा विक्रम मोडला. संधूनं 1983 मध्ये हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध 71 धावांची इनिंग खेळली होती. त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात 71 आणि दुसऱ्या डावात 12 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेची संघर्षपूर्ण सुरुवात : श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण आघाडीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कर्णधार धनंजय डी सिल्वा काही काळ मधल्या खेळपट्टीवर राहिला आणि त्यानं 74 धावा केल्या, पण इतर फलंदाजांनी विशेष योगदान दिलं नाही.
Milan Rathnayake announces himself on the Test stage with a brilliant maiden fifty (72)! What a start to his career. #ENGvSL pic.twitter.com/w0h1pIFWQ7
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 21, 2024
मिलन रत्नायकेची चमकदार कामगिरी : नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिलन रत्नायकेनं आपल्या खेळीने सर्वांना चकित केलं. त्यानं कर्णधार धनंजय डी सिल्वासोबत महत्त्वाची भागीदारी रचली आणि श्रीलंकेच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रत्नायकेनं 135 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी केली.
इंग्लंडचं आव्हान : श्रीलंकेच्या कमकुवत खेळीनंतर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणं सोपं नसेल. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं एकही विकेट न गमावता 22 धावा केल्या होत्या. आता या सामन्यात इंग्लंड किती मोठी आघाडी घेते आणि श्रीलंकेला या आव्हानाला कसं सामोरं जाणार हे पाहायचं आहे.
हेही वाचा :