चेन्नई : CSK vs KKR IPL 2024 : आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार : गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, एमएस धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तसंच, धोनी ज्या पातळीवर पोहचला आहे, तिथपर्यंत पोहचणं खूप कठीण असल्याचं देखील गंभीरने सांगितलं. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं आहे, असंही गंभीर यावेळी म्हणाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 साली वन-डे विश्वचषकही भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने जिंकले 5 वेळा जेतेपद : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तरीही त्याने आयपीएलमध्ये खेळणं सुरू ठेवलं आहे. गेल्या मोसमात कर्णधार असताना धोनीने चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपद मिळवून दिलं, जी संघाची पाचवी ट्रॉफी होती. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत पाचही ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र, या हंगमात धोनी चेन्नईचे नेतृत्व करत नाही. यंदाच्या मोसमात ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार आहे. आता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघ यंदाच्या मोसमात कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
शाहरुख खानची गौतम गंभीरला ऑफर : गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतलाय. खेळाडू म्हणून नाही तर मेंटॉर म्हणून तो काम पाहतोय. गौतम गंभीर कोलकात्याचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलाय. गौतमच्या नेतृत्वात कोलकात्यानं दोन वेळा चषकावर नाव कोरलंय. कोलकात्यासोबत सात वर्षे प्रवास केल्यानंतर गौतम गंभीरने दिल्लीच्या ताफ्यात जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. लखनौसंघासोबत तो मेंटॉर म्हणून काम पाहत होता. लखनौला दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये नेहण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. आपल्या हुकमी एक्क्याला माघारी बोलवण्यासाठी शाहरुख खानने कंबर कसली होती. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने गौतम गंभीरला कोलकात्याच्या ताफ्यात माघारी परतण्यासाठी चक्क ब्लँक चेक ऑफर केला होता.
कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11 : सुनील नरेन, फिल साल्ट, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर- सुयश शर्मा.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग 11 : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरिल मिचेल, रवींद्र जड़ेजा, समीर रिजवी/मिचेल सेंटनर, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.
इम्पॅक्ट प्लेयर- मुकेश चौधरी