मुंबई MS Dhoni in IPL 2025 : IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. परंतु BCCI नं अद्याप कायम ठेवण्याचं धोरण जाहीर केलेलं नाही. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी IPL चा पुढचा हंगाम खेळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. BCCI नं पाच ते सहा खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम लागू केला, तरच धोनी पुढील हंगामात खेळेल, असा अहवाल यापूर्वी आला होता. पण आता चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
The BCCI could take more time to release the IPL retention rules. (Cricbuzz). pic.twitter.com/wze6N42fDN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 13, 2024
एमएस धोनीला कोणत्याही परिस्थितीत होणार रिटेन : क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, एमएस धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा निर्णय कोणत्याही धोरणावर अवलंबून नाही. यापूर्वी, असं वृत्त होतं की BCCI जेव्हा IPL 2025 मेगा लिलावासाठी रिटेन धोरण जाहीर करेल तेव्हा सीएसके आणि धोनी त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेतील. पण आता सीएसकेचे अधिकारी असंही म्हणतात की, धोनीनं पुढच्या हंगामात खेळण्याचा निर्णय घेतला आणि BCCI नं फक्त दोनच रिटेन्शन ठेवण्याची परवानगी दिली असली तरी तो त्यांच्या रिटेन्शनपैकी एक असेल.
IPL RETENTIONS
— Riseup Pant (@riseup_pant17) September 13, 2024
-CSK OFFICIAL : If Ms Dhoni decides to play next season. He will be on our retention list even if BCCI allows 2 retentions only.
-RULES likely to get delayed to end of this month
-RTM will be there this time
-Most Probably it will be
3 + 2 RTM or 4 + 2 RTM… pic.twitter.com/8Nt8OUVL6p
रिटेंशन धोरण कधी होणार जाहीर : रिपोर्ट्सनुसार, रिटेन्शन नियम जारी होण्यासाठी आणखी वेळ लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) महिन्याच्या शेवटपर्यंत घोषणा पुढं ढकलू शकतं. 29 सप्टेंबर रोजी बेंगळुरु इथं होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे. BCCI च्या अधिकाऱ्यांनी फ्रँचायझींना या विलंबाची माहिती दिल्याचं मानलं जातं, ज्यांनी नुकतंच रिटेन्शन नियमांबाबत त्यांच्याशी संपर्क साधला होता.
तो नियम पुन्हा सुरु होणार : दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंचा अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो, अशीही बातमी समोर आली आहे. वास्तविक, याआधी आयपीएलमध्ये असा नियम होता की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 किंवा त्याहून अधिक वर्षे निवृत्ती घेतलेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू मानलं जातं होतं. 2021 नंतर हा नियम रद्द करण्यात आला होता, मात्र हा नियम पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :