हैदराबाद Retirement on 15 August : क्रिकेट विश्वात मैत्रीची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. पण एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्यातील मैत्री कायम आहे. त्यांची मैत्री केवळ मैदानापुरती मर्यादित नाही कारण ते बाहेरच्या जगातही क्रिकेटच्या खूप जवळ आहेत. त्यांची मैत्री अशी आहे की एकीकडे धोनीला 'थाला' तर दुसरीकडे रैना 'चिन्ना थाला' म्हणून ओळखलं जातं. (MS Dhoni Retirement)
MS Dhoni & Suresh Raina retired together " otd in 2020" from international cricket 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) August 15, 2024
- best friends forever, iconic duo...!!!!! pic.twitter.com/264YnZwEBj
कधी घातला गेला मैत्रीचा पाया : सुरेश रैनानं त्याच्या पुस्तकात (आत्मचरित्र) लिहिलं की एमएस धोनीसोबतच्या त्यांच्या मैत्रीचा पाया 2005च्या दुलीप ट्रॉफीदरम्यान घातला गेला. त्या दिवसांत, फेब्रुवारी 2005 मध्ये ग्वाल्हेरमध्ये एक सामना खेळला जात होता. ज्यामध्ये धोनीचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आक्रमक खेळण्याची शैली पाहून रैना खूप प्रभावित झाला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या वरिष्ठांसाठी बंगळुरु इथं आयोजित केलेल्या सराव सत्रातही हे दोघं एकत्र दिसले. कालांतरानं त्यांची मैत्री इतकी वाढली की ते ड्रेसिंग शेअर करु लागले. (MS Dhoni Retirement News Marathi)
CSK POSTER FOR MS DHONI...!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) August 15, 2024
- Thala is an emotion for cricket, the legacy is unmatched. 💛 pic.twitter.com/TL3ASwsxQZ
धोनी आणि रैना 15 ऑगस्टला झाले निवृत्त : एमएस धोनीनं त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जुलै 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला. क्रिकेटपासून दूर राहून एक वर्षाहून अधिक काळ लोटला होता, जेव्हा 15 ऑगस्ट 2020 रोजी, म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी, (Independence Day) एमएस धोनीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीच्या वृत्तातून क्रिकेटविश्व अजून सावरले नव्हतं, त्यानंतर काही तासांनंतर सुरेश रैनानंही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मी क्रिकेटला अलविदा करत असल्याचं त्यानं कॅप्शनद्वारे सांगितलं.
15 ऑगस्टला निवृत्ती का : सुरेश रैनानं फार पूर्वी एका मीडिया मुलाखतीत 15 ऑगस्ट रोजी निवृत्तीचं कारण स्पष्ट करताना सांगितलं होतं. "आम्ही 15 ऑगस्टला निवृत्ती घेण्याचं आधीच ठरवलं होतं. धोनीची जर्सी क्रमांक 7 आहे, माझी जर्सी क्रमांक आहे 3." दोघांनी मिळून 73 वर्षे केली आणि 15 ऑगस्ट 2020 रोजी भारतानं स्वातंत्र्याची 73 वर्षे पूर्ण केली. निवृत्तीसाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही.
धोनीनं बनवलं विश्वविजेता : सुरेश रैना 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा एक भाग होता. पण एक कर्णधार म्हणून एमएस धोनीचं यश बरंच काही सांगून जातं. 2007 च्या टी 20 विश्वचषकादरम्यान धोनीकडं कर्णधारपद सोपवण्यात आलं आणि भारताला विश्वविजेता बनवलं. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. मात्र धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
हेही वाचा :