ETV Bharat / sports

वाढदिवसानिमित्त इशान किशन भक्तीभावात तल्लीन; शिर्डीत साई बाबांच्या दरबारी पोहोचत घेतले आशीर्वाद - Ishan Kishan Birthday

Ishan Kishan Birthday : भारतीय क्रिकेट संघापासून दूर असलेला सलामीवीर इशान किशननं आज वाढदिवसानिमित्त शिर्डीत साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीकडून त्याचा सत्कार करण्यात आला.

Ishan Kishan Birthday
इशान किशन भक्तीभावात तल्लीन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 5:34 PM IST

शिर्डी Ishan Kishan Birthday : भारतीय क्रिकेट संघापासून दूर असलेला सलामीवीर फलंदाज इशान किशननं आज शिर्डीत साई मंदिरात साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज वाढदिवस असल्यानं साईबाबांच्या दर्शनासाठी आल्याचं किशननं म्हटलंय.

शिर्डीत इशान किशनचा वाढदिवस साजरा (ETV Bharat Reporter)
मंदिराकडून किशनचा सत्कार : सलामीवीर फलंदाज इशान किशनचा आज 26 वा वाढदिवस असल्यानं साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता. वाढदिवस असल्यानं साईबाबांच्या सकाळच्या काकड आरतीलाही हजेरी लावली. साईबाबांच्या आरतीनंतर द्वारकामाई, गुरुस्थानमध्ये जाऊनही दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी शाल तसंच साईबाबांची उदी देवून किशनचा सत्कार केला. यावेळी साई मंदिर परिसरातील भाविकांनी किशनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच इशान किशनच्या वाढदिवसानिमित्त त्याचे शिर्डीतील मित्र संजय कोतकर व दीपक साळुंके यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसंच शाल आणि साई मूर्ती देवून सत्कार करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

2021 मध्ये केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण : इशान किशननं 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. आतापर्यंत इशान किशननं 32 टी 20 सामने खेळले आहेत. या डावखुऱ्या फलंदाजानं 124 च्या स्ट्राइक रेटनं 796 धावा केल्या आहेत. एकदिवसीयमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे. यासोबतच त्यानं कसोटी क्रिकेटमध्येही अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएलमध्येही इशाननं दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यानं आयपीएलमध्ये 135 च्या स्ट्राईक रेटनं 2644 धावा केल्या आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघातून काढून टाकल्यानंतर तो पुनरागमन करु शकला नाही.

सध्या भारतीय संघापासून दूर : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन मागील काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघातून काढून टाकल्यानंतर तो पुन्हा पुनरागमन करु शकलेला नाही. इशान संघात परतण्यासाठी खूप उत्सुक आहे. सराव असो वा उपासना, इशान कशातही कसर सोडत नाही, तो सर्व काही करत आहे.

हेही वाचा :

  1. किशनच्या 'शान'दार खेळीनंतर 'सूर्य' तळपळला; तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावूनही आरसीबीचा 'विराट' पराभव - MI vs RCB
  2. बीसीसीआयकडून खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यरसह इशान किशनची काढली विकेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.