ETV Bharat / sports

पाच चेंडूत चार विकेट...; टी 20 विश्वचषकात 14 तासांत दुसरी हॅट्ट्रिक; इंग्लंडच्या गोलंदाजानं रचला इतिहास - T20 WORLD CUP 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 9:55 PM IST

Updated : Jun 23, 2024, 10:19 PM IST

Chris Jordan Hat-Trick : टी 20 क्रिकेट विश्वचषकाच्या सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक साधली.

chris jordan
ख्रिस जॉर्डन (Social Media)

बार्बाडोस Chris Jordan Hat-Trick : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाच्या 49 व्या सामन्यात, इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डननं अमेरिका संघाविरुद्ध हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. यासह तो आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यानं अमेरिकेविरुद्ध पाच चेंडूत 4 विकेट घेतल्या, त्यामुळं प्रथम फलंदाजी करणारा अमेरिका संघ केवळ 115 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे 14 तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं हॅट्ट्रिक घेतली होती.

पाच चेंडूत घेतले चार बळी : जॉर्डननं अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 18.5 षटकात केवळ 115 धावा करत गडगडला. अमेरिकेकडून नितीश कुमारनं सर्वाधिक 30 आणि कोरी अँडरसननं 29 धावा केल्या. मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉर्डनसमोर अमेरिकन संघ असहाय्य दिसत होता. जॉर्डननं 2.5 षटकांत 10 धावांत 4 बळी घेतले. यात त्यानं हॅट्ट्रिकही घेतली. जॉर्डननं डावाच्या 19व्या षटकात ही कामगिरी केली. अली खान, नॉथुश केंजिगे आणि सौरभ नेत्रावलकर यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून त्यानं हॅट्ट्रिक साधली. जॉर्डननं षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर या तीन विकेट घेतल्या. त्याचे बळी ठरलेल्या तिन्ही खेळाडूंना आपलं खातंही उघडता आले नाही.

पहिलाच इंग्लिश खेळाडू : विशेष म्हणजे ख्रिस जॉर्डन टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तर टी 20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही एकूण 9वी हॅट्ट्रिक आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात एकाच दिवशी दोन हॅट्ट्रिक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच याआधी टी 20 विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक 3 हॅटट्रिक्स घेतल्या होत्या. 2021 च्या हंगामात हे घडलं. या हंगामातही पॅट कमिन्सनं 2 आणि जॉर्डनने 1 हॅटट्रिक घेत या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता आणखी एक हॅट्ट्रिक झाली तर टी 20 विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक 3 हॅट्ट्रिकचा विक्रमही मोडेल.

हेही वाचा :

  1. Exclusive : अफगाणिस्तानचा हा विजय निश्चितच होता; कांगारुंच्या पराभवावर काय म्हणाले अफगाण संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत? - T20 WORLD CUP 2024
  2. अफगाणिस्तानच्या विजयानंतर काय आहे सेमीफायनलचं समीकरण; उपांत्य फेरी गाठणं भारतासाठीही आहे कठीण - T20 World Cup 2024

Last Updated : Jun 23, 2024, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.