चेन्नई IPL 2024 CSK vs SRH : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात विजयी मार्गावर परतलाय. चेन्नई संघानं सलग 2 पराभवानंतर विजयाची नोंद केली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 78 धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नई संघानं गुणतालिकेत मोठी झेप घेतलीय. या संघानं सहाव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय. चेन्नई संघानं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सला पराभवानंतर मोठा फटका बसला आहे. हा संघ चौथ्या स्थानावर घसरलाय. सनरायझर्स संघानं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत.
हैदराबादचे फलंदाज अपयशी : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं हैदराबादसमोर 213 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हैदराबादचा संघ 18.5 मध्ये केवळ 134 धावा करु शकला. त्यांनी सामना गमावला. सनरायझर्सकडून एडन मार्करमनं 32 आणि हेनरिक क्लासेननं 20 धावा केल्या. या दोघांशिवाय सनरायझर्स संघातील कोणालाही 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं चेन्नई संघासाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मथिशा पाथिराना आणि मुस्तफिजुर रहमान यांनी 2-2 बळी मिळवले. शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनीही 1-1 विकेट मिळवली.
-
Batting 🤝 Bowling 🤝 Fielding @ChennaiIPL put on a dominant all-round performance & continue their good show at home 🏠
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
Scorecard ▶️ https://t.co/uZNE6v8QzI#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/RcFIE9d46K
गायकवाडचं शतक हुकलं : तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघानं 3 विकेट गमावत 212 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 54 चेंडूत 98 धावा केल्या. त्याचं सलग दुसरं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. गायकवाडनं 3 षटकार आणि 10 चौकार मारले. त्याच्याशिवाय डेरील मिशेलनं 32 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी खेळली. तर शिवम दुबेनं 20 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. हैदराबाद संघासाठी कोणताही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चेन्नईनं घेतला पराभवाचा बदला : या हंगामातील उभय संघांमधील हा दुसरा सामना होता. यापूर्वी 5 एप्रिल रोजी चेन्नई आणि हैदराबादमध्ये सामना झाला होता. त्यात हैदराबादनं चेन्नईला 165 धावांवर रोखले. अवघ्या 18.1 षटकात 6 विकेट्स राखून सामना जिंकला. अशा परिस्थितीत चेन्नईनं हा सामना जिंकून त्या पराभवाचा बदला घेतलाय.
हेही वाचा :