ETV Bharat / sports

बंगळुरूला नमवण्याचे राजस्थानसमोर आव्हान! आकडेवारीत आरसीबीचा वरचष्मा - RCB and vs Rajasthan Royals

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये आज बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश करेल.

आयपीएल 2024
IPL 2024 ((IANS PHOTOS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 2:31 PM IST

मुंबई - IPL 2024 : क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाचा मुद्दा असो की विजयाचा दावा, आधी पाहिला फॉर्म आणि आकडेवारी पाहिली जाते. १७ वर्षांपासून जेतेपदाकडे डोळे लावून बसलेला आरसीबीचा संघ प्रथमच या दोन्ही बाबतीत प्रतिस्पर्धी संघापेक्षा वरचढ दिसत आहे. बुधवारी आयपीएल २०२४ च्या (IPL) 'एलिमिनेटर' सामन्यात आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 'क्वालिफायर-२' मध्ये प्रवेश करेल तर पराभूत संघाचा प्रवास इथेच संपेल.

बंगळुरूचा संघ नवव्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला : आयपीएलचा हा १७वा सीझन आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नवव्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. राजस्थान रॉयल्स आपला १५वा हंगाम खेळत सहाव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या संघाचा संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सवर वरचष्मा पाहायला मिळतो. आयपीएलच्या पहिल्या सीझनचे विजेतेपद राजस्थान रॉयल्स संघाने पटकावले. मात्र त्यानंतर हा संघ कधीच फायनलमध्ये पोहोचला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. मात्र एकही विजेतेपद मिळवता आले नाही. बंगळुरू संघ अंतिम फेरीत अडकला तरी प्लेऑफची पहिली फेरी पार करण्याचा त्याचा विक्रम चांगला राहिला आहे.

बंगळुरूची सर्वोत्तम कामगिरी : आयपीएल २०२४ मधील फॉर्मबद्दल बोलायचे तर बंगळुरू आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहे. सलग ६ सामने जिंकून हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघाने अखेरचा विजय २७ एप्रिल रोजी मिळवला होता. यानंतर खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

बंगळुरूचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये: बंगळुरूसाठी चांगली गोष्ट म्हणजे या संघाचे सर्वच फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सलामीवीर फाफ डू प्लेसिसही ला चांगली साथ देत आहे. तर रजत पाटीदार मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत आहे. कॅमेरून ग्रीन आणि दिनेश कार्तिकही फॉर्मात आहेत.

राजस्थानला बटलरची उणीव भासेल: राजस्थान रॉयल्सला जोस बटलरची उणीव भासणार आहे. इंग्लंडचा जोस बटलर आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ बुधवारपासून पाकिस्तानसोबत टी-20 मालिका खेळणार आहे. बटलरच्या अनुपस्थितीमुळे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर दबाव वाढला आहे.

हेही वाचा :

  1. कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose
  2. कोलकाताने हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत के्ला प्रवेश, व्यंकटेश-श्रेयसची शानदार अर्धशतके - KKR vs SRH IPL 2024
  3. केकेआर विरुद्ध आरआरच्या सामन्यात पावसानं काढली विकेट, दोन्ही संघाला मिळाले एकेक गुण - RR vs KKR

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.