मुंबई India vs England Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून या संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयनं कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्स इथं खेळवला जाणार आहे, तर शेवटची कसोटी 31 जुलै रोजी होणार आहे. याशिवाय भारतीय संघ बर्मिंगहॅम, लॉर्ड्स आणि मँचेस्टर इथंही कसोटी सामने खेळणार आहे. याशिवाय महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, यात ते पाच टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. भारत-इंग्लंड महिला टी 20 मालिका 28 जून ते 12 जुलै दरम्यान चालणार आहे, तर एकदिवसीय मालिका 16, 19 आणि 22 जुलै रोजी होणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 20 ते 24 जून 2025, हेडिंग्ले
- दुसरी कसोटी - 2 ते 6 जुलै 2025, बर्मिंगहॅम
- तिसरी कसोटी - 10 ते 14 जुलै 2025, लॉर्ड्स
- चौथी कसोटी - 23 ते 27 जुलै 2025, मँचेस्टर
- पाचवी कसोटी - 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025, लंडन
Announced! 🥁
— BCCI (@BCCI) August 22, 2024
A look at #TeamIndia's fixtures for the 5⃣-match Test series against England in 2025 🙌#ENGvIND pic.twitter.com/wS9ZCVbKAt
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय महिला संघाचं वेळापत्रक :
- पहिला टी 20, 28 जून 2025, नॉटिंगहॅम
- दुसरा टी 20, 1 जुलै 2025, ब्रिस्टल
- तिसरा टी 20, 4 जुलै 2025, लंडन
- चौथा टी 20, 9 जुलै 2025, मँचेस्टर
- पाचवा टी 20, 12 जुलै 2025, बर्मिंगहॅम.
- पहिला एकदिवसीय, 16 जुलै 2025, साउथॅम्प्टन
- दुसरा एकदिवसीय, 19 जुलै 2025, लॉर्ड्स
- तिसरा एकदिवसीय, 22 जुलै 2025, चेस्टर-ली-स्ट्रीट
𝗔𝗹𝗹 𝗦𝗲𝘁!👍 👍#TeamIndia's schedule for the 5⃣ T20Is and 3⃣ ODIs against England in 2025 ANNOUNCED 🗓️#ENGvIND pic.twitter.com/fb0tScY8cq
— BCCI Women (@BCCIWomen) August 22, 2024
भारतीय संघ 17 वर्षांपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही : इंग्लंड दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी मोठ्या कसोटीपेक्षा कमी नाही. भारतीय संघानं गेल्या 17 वर्षांपासून इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये जिंकली होती. गेल्या दौऱ्यात भारतीय संघ नक्कीच विजयाच्या जवळ आला होता. 2021-22 च्या इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. गेल्या मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर होता. पण, शेवटच्या कसोटीत पराभव पत्करावा लागला आणि मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय भारतीय संघानं इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही फायनल गमावल्या आहेत, त्यामुळं रोहित आणि गंभीरच्या जोडीसाठी हा दौरा सोपा जाणार नाही हे स्पष्ट आहे.
हेही वाचा :