रावळपिंडी (पाकिस्तान) PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. चौथ्या डावात पाकिस्ताननं दिलेलं 30 धावांचं लक्ष्य बांगलादेशनं एकही गडी न गमावता गाठत इतिहास रचला आहे. बांगलादेशचा पाकिस्तानवर हा पहिलाच कसोटी विजय आहे. (pakistan national cricket team)
Bangladesh becomes the first team to beat Pakistan at home in a Test match by 10 wickets. 🚨 pic.twitter.com/kvXrHYx32A
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 25, 2024
पाकिस्तानवर पहिलाच कसोटी विजय : बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. जिथं या दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी इथं झाला. ज्यात बांगलादेशनं बाजी मारली. कसोटी इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय आहे. बांगलादेशनं 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते पाकिस्तानविरुद्ध 15 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी प्रथमच विजय मिळवला आहे. याआधी 12 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. एक रद्द करण्यात आला. (pak vs ban test live)
Pakistan in the last 30 months at home:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 25, 2024
- Lost the Test series Vs Australia.
- Lost the T20i series Vs England.
- Lost the Test series Vs England.
- Drawn the Test series Vs New Zealand.
- Lost the ODI series Vs New Zealand.
- Lost a Test match for the first time Vs Bangladesh. pic.twitter.com/dVk6X3Rx9o
खराब सुरुवातीनंतर उभारली मोठी धावसंख्या : सामन्यात खराब सुरुवातीनंतर पाकिस्तान संघानं सौद शकील आणि मोहम्मद रिझवानच्या शतकांच्या जोरावर पहिल्या डावात 6 विकेट गमावत 448 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येवर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं डाव घोषित केला. यात रिझवाननं 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 171 धावा केल्या. तर शकीलनं आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत 141 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूद आणि शरीफुल इस्लामनं प्रत्येकी 2 बळी घेतले.
On Day 2 - Pakistan 448/6 declared in the first innings.
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2024
On Day 5 - Pakistan lost the Test match by 10 wickets. pic.twitter.com/CN5asBcnGo
बांगलादेशनं घेतली 117 धावांची आघाडी : यानंतर बांगलादेशनं पहिल्या डावात 565 धावा केल्या. त्यामुळं बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची आघाडी मिळाली. मुशफिकुर रहीमनं संघाकडून 191 धावांची खेळी केली. रहीमच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11वं शतक ठरलं. रहिमनं आपल्या खेळीत 22 चौकार आणि 1 षटकार लगावला. शादमान इसमान (97), महेदी हसन मिराज (77), लिटन दास (56) आणि मोमिनुल हक यांनी अर्धशतकांचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून नसीम शाहनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर खुर्रम शहजाद, मोहम्मद अली आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
बांगलादेशला दिलं 30 धावांचं लक्ष्य : यानंतर दुसऱ्या डावात 117 धावांची आघाडी घेऊन लक्ष्य देण्याच्या दबावाखाली पाकिस्तानचा संपूर्ण संघ विस्कळीत होताना दिसला. पाकिस्तानचा संघ 146 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून रिझवान पुन्हा एकदा चमकला आणि त्यानं 51 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय अब्दुल्ला शफीकनं 37, बाबर आझमनं 22 आणि कर्णधार शान मसूदनं 14 धावा केल्या. यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तान संघानं दुसऱ्या डावात 146 धावा केल्या आणि बांगलादेशला फक्त 30 धावांचं लक्ष्य दिलं.
हेही वाचा :