रावळपिंडी PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील रावळपिंडी कसोटी सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. सामन्याच्या पहिल्या सत्रात बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांच्या उत्कृष्ट स्पेलनंतर सलग 3 दिवस केवळ फलंदाजच वर्चस्व गाजवत आहेत. पाकिस्तानी फलंदाजांकडून अशी कामगिरी अपेक्षित होती. कारण ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत आहेत, पण त्यांच्यापेक्षा बांगलादेशचे फलंदाज अधिक प्रभावी ठरतील याचा विचार पाकिस्ताननं केला नाही. विशेषत: जेव्हा संघानं आघाडीच्या फिरकी गोलंदाजाच्या जागी चार वेगवान गोलंदाजांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमनं पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची पिसं काढत शानदार शतक झळकावलं आणि विक्रमही केला. त्यानं 341 चेंडूचा सामना करत 191 धावा केल्या. यात त्यानं 22 चौकार तर 1 षटकार लगावला.
Bangladesh scored 565 in 167.3 overs against Pakistan at the Rawalpindi. pic.twitter.com/OyUgguFcPQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 24, 2024
वेगवान गोलंदाजांची पिसं काढत केलं शानदार शतक : पिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शादमान इस्लाम, मोमिनुल हक, लिटन दास आणि मुशफिकुर रहीम यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा धैर्यानं सामना करत संघाला सामन्यात कायम ठेवलं. तिसऱ्या दिवशीही पाकिस्तानला यश मिळालं आणि 218 धावांपर्यंत 5 विकेट गमावल्या, त्यानंतर लिटननं पलटवार करत अर्धशतक झळकावलं. आज चौथ्या दिवशी लिटन लवकर बाद झाला पण त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांची वेगवान गोलंदाजी निष्रभ झाली.
WELL PLAYED, MUSHFIQUR RAHIM....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) August 24, 2024
- 191 runs from 341 runs including 22 fours & 1 six against Pakistan, missed a well deserving double hundred by just 9 runs. A legend of Bangladesh cricket 👊 pic.twitter.com/363ssyYlZ6
बांगलादेशनं घेतली आघाडी : सामन्याच्या चौथ्या दिवशी माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मुशफिकुरनं अर्धशतकी खेळी वाढवली आणि मेहदी हसन मिराझसह संघाला 400 धावांच्या जवळ नेलं. दरम्यान, फिरकीपटू आगा सलमानच्या चेंडूवर एक धाव घेत मुशफिकुरनं शानदार शतक पूर्ण केलं. 89 वा कसोटी सामना खेळणाऱ्या या फलंदाजाचे हे 11 वं शतक आहे. तसंच मुशफिकुरचे हे पाकिस्तानविरुद्ध पहिलं शतक आहे. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज मुशफिकरला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्यात अपयशी ठरले. त्याच्या दीडशतकाच्या जोरावर बांगलादेशनं पहिल्या डावात पाकिस्तानची 448 धावांची धावसंख्या मागे टाकत पहिल्या डावात सर्वबाद 565 धावा करत पाकिस्तानवर 117 धावांची आघाडी घोतली.
एका डावात केले अनेक विक्रम : बांगलादेशकडून सर्वाधिक कसोटी शतकं झळकावण्याच्या बाबतीत मुशफिकुर आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं तमीम इक्बालला (10) मागं टाकलं. इतकंच नव्हे तर बांगलादेशकडून परदेशी भूमीवर सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही आता मुशफिकुरच्या नावावर आहे. या 37 वर्षीय फलंदाजाचं परदेशात हे 5 वं शतक आहे आणि त्यानं यात तमिमला मागं टाकलं. मुशफिकुरचा हा पाकिस्तानमधील पहिलाच कसोटी सामना आहे आणि त्यानं पहिल्याच डावात हे शतक झळकावलं आहे, तर विराट आणि रोहितसह सध्याच्या भारतीय फलंदाजांना पाकिस्तानविरुद्ध एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
हेही वाचा :