होबार्ट : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना 11 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण वेस्ट इंडिजचा 11 धावांनी पराभव झाला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर विजयाचा शिल्पकार ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना कांगारूंनी जिंकलाय. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावा करत विजयासाठी 214 धावांचं आव्हान ठेवलं. वेस्ट इंडिजनं 8 विकेट गमावून 202 धावा केल्या. यासोबतच पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजला 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा आक्रमक अंदाज या सामन्यात पाहायला मिळाला. त्यानं 36 चेंडूत 70 धावा केल्या. त्यात 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय जोश इंग्लिश आणि टीम डेव्हिड यांनी चांगली खेळी केली. वेस्ट इंडिजकडून रसेलनं 3, अल्झारी जोसेफनं 2 आणि होल्डर आणि शेफर्डनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
डेव्हिड वॉर्नरनं रचला इतिहास : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळवला गेला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 213 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरचा हा 100 वा T20 आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात वॉर्नरनं 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 36 चेंडूत 194.44 च्या स्ट्राइक रेटनं 70 धावा केल्या. त्यामुळं डेव्हिड वॉर्नर हा पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे, ज्यानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळले आहेत. याशिवाय ही कामगिरी करणारा वॉर्नर जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. वॉर्नरनं आपल्या 100व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 धावांची करत इतिहास रचला आहे.
कसोटीत 200 धावांची इनिंग : डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या 100 व्या सामन्यात 50 हून अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरनं आपल्या 100व्या कसोटीत 200 धावांची इनिंग खेळली. वॉर्नरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला होता. याशिवाय त्यानं भारताविरुद्ध 100 वा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यात त्यानं शतक झळकावलं होतं. त्यानं आपला 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला आहे. ज्यामध्ये त्यानं 70 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर व्यतिरिक्त, फक्त न्यूझीलंडचा रॉस टेलर आणि भारताचा विराट कोहली यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळले आहेत.
डेव्हिड वॉर्नरची आक्रमक फलंदाजी : सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनं सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर आणि जोश इंग्लिश यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नरशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मात्र, 200 हून अधिक धावा करण्यात संघाला यश आलं. डेव्हिड वॉर्नरनं 70, जोश इंग्लिशनं 39, टीम डेव्हिडनं 37 आणि मॅथ्यू वेडनं 21 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेलनं ३ बळी घेतलं, तर अल्झारी जोसेफनं दोन कांगारू फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिजनं दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती, मात्र त्यानंतर पाहुण्या संघाचा ऑस्ट्रेलियाकडून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा पराभव झाला.
हे वाचलंत का :