शारजाह AFG Beat BAN By 5 Wickets : अफगाणिस्तान क्रिकेट संघानं चमकदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे. त्यांचा हा सलग तिसरा वनडे मालिका विजय आहे. रहमानउल्ला गुरबाजचं शतक आणि अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्ताननं तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्ताननं मालिकेतील पहिला सामना 92 धावांनी जिंकला होता. यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशनं अफगाण संघाचा 68 धावांनी पराभव केला होता.
𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒! 🙌@AzmatOmarzay finishes the match and the series with a big blow down the ground! 👏🤩
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 11, 2024
Enjoy the winning moments here! 👇#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/xxI1rZ6O3S
बांगलादेशनं केल्या 244 धावा : शेवटच्या वनडेबद्दल बोलायचं झाले तर बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 गडी गमावून 244 धावा केल्या. महमुदुल्लाह रियादनं सर्वाधिक 98 चेंडूत 98 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद नबी आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍 𝐓𝐇𝐄 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒 𝟐-𝟏 🙌#AfghanAtalan put on a remarkable batting performance to successfully chase down the target and secure a 2-1 series victory in the three-match ODI series against @BCBtigers. 👏#AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/8uYHtrODIB
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 11, 2024
गुरबाजचं विक्रमी शतक : बांगलादेशनं दिलेलं 245 धावांचं लक्ष्य अफगाणिस्ताननं 48.2 षटकांत 5 गडी गमावत गाठलं. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजनं विक्रमी शतक झळकावले. त्यानं 120 चेंडूत 101 धावांची खेळी खेळली. विशेष म्हणजे गुरबाज मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत शुन्यावर आउट झाला होता. अजमतुल्ला उमरझाईनंही 77 चेंडूत 70 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वपुर्ण योगदानं दिलं. बांगलादेशकडून नाहिद राणा आणि मुस्तफिजुर रहमाननं प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच कॅप्टन मिराजला 1 यश मिळाले.
𝐀𝐥𝐥-𝐑𝐨𝐮𝐧𝐝 𝐏𝐞𝐫𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐧𝐜𝐞 𝐚𝐭 𝐢𝐭𝐬 𝐯𝐞𝐫𝐲 𝐛𝐞𝐬𝐭 - 𝟕𝟎* (𝟕𝟕) & 𝟒/𝟑𝟕 🤩
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 11, 2024
A performance to remember from @AzmatOmarzay, who went on to bag his maiden Player of the Match Award! 🙌
Richly deserved! 🤝#AfghanAtalan | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/rxj64waxlT
गुरबाजनं सचिन-कोहलीचा विक्रम मोडला : या वनडे सामन्यात अफगाणिस्तान रहमानउल्ला गुरबाजनं वनडे कारकिर्दीतील 8 वं शतक पूर्ण केलं. गुरबाजनं 117 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे. या शतकासह त्यानं भारताच्या दोन महान फलंदाजांना मागं सोडलं. वास्तविक गुरबाज हा 8 वनडे शतकं झळकावणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. गुरबाजनं केवळ 22 वर्षे 349 दिवसांत 8 वनडे शतकं पूर्ण केली आहेत. अशाप्रकारे त्यानं सचिन (22 वर्षे 357 दिवस) आणि विराट कोहली (23 वर्षे 27 दिवस) यांना मागे टाकले. त्याच्याशिवाय बाबर आझम (23 वर्षे 280 दिवस) देखील मागे राहिला. या बाबतीत केवळ दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज क्विंटन डी कॉक (22 वर्षे 312 दिवस) गुरबाजच्या पुढं आहे. वयाच्या 22 व्या वर्षी गुरबाजनं अवघ्या 46 डावात हा विक्रम केला, जो एक नवा विश्वविक्रम आहे.
Rahmanullah Gurbaz, Azmatullah Omarzai spur Afghanistan to a series win in Sharjah 👊#BANvAFG 📝: https://t.co/unHFIvGMLR pic.twitter.com/bXq5B9oOw5
— ICC (@ICC) November 11, 2024
बांगलादेशनं पाकिस्तानला हरवलं : सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेश संघानं पाकिस्तानला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत धुळ चारली होती. त्यांनी दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 नं जिंकत पाकिस्तानला धुळ चारली होती. मात्र आता अफगामिस्ताननं जे पाकिस्तानला जमलं नव्हतं ते करुन दाखवलं होतं.
💯 for Rahmanullah Gurbaz!
— ICC (@ICC) November 11, 2024
The Afghanistan opener is leading the way for his team in the series decider 👌 #BANvAFG 📝: https://t.co/lKmnMJjtyO pic.twitter.com/TqVMJgHSAz
हेही वाचा :