मुंबई Indian Team Coaching Staff : भारतीय क्रिकेट संघ 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टी 20 विश्वचषकानंतर प्रथमच एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कोचिंगखाली भारतीय संघ हा पहिलाच सामना खेळणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गंभीरला नुकतंच भारतीय संघाचं प्रशिक्षक बनवण्यात आलं.
The likely coaching staff of Indian team. [Cricbuzz]
— Johns. (@CricCrazyJohns) July 20, 2024
Coach - Gambhir
Assistant coach - Abhishek Nayar
Assistant coach - Ryan Ten Doeschate
Fielding coach - T Dilip
Bowling coach - Morne Morkel (Big favourite) pic.twitter.com/7j3YI7KbSr
औपचारिक घोषणा बाकी : श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला सपोर्ट करणाऱ्या कोचिंग स्टाफमध्ये नवीन सहभागी सामील होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर आणि माजी डच क्रिकेटपटू रायन टेन डोशेट भारतीय संघात सामील होणार आहेत. मात्र, बीसीसीआयनं अद्याप त्याची औपचारिक घोषणा केलेली नाही. यासोबतच टी दिलीप हे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून संघाची सेवा करत राहणार आहे. दिलीपनं केवळ एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली नाही, तर टी दिलीपनं सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्काराची परंपराही सुरु केली.
मॉर्नी मॉर्केल होणार गोलंदाजी प्रशिक्षक : डच क्रिकेटपटू रायन आणि अभिषेक नायर यांनी गौतम गंभीरसोबत कोलकाता नाइट रायडर्ससाठी सपोर्ट स्टाफ म्हणून काम केलं आहे. केकेआरमध्ये रायन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते, त्यामुळं आता टी दिलीपच्या भारतीय संघात असताना रायन संघासाठी कोणत्या प्रकारची भूमिका बजावणार हे पाहणं बाकी आहे. नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत काही संदिग्धता कायम आहे. परंतु मॉर्नी मॉर्केल एक मजबूत उमेदवार असल्यानं, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज गंभीरच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल. दिलीप आणि नायर सोमवारी संघासोबत प्रवास करतील, परंतु टेन डोस्चेट केव्हा आणि कसे संघात सामील होतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या सुरु असलेल्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मध्ये लॉस एंजलिस नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून तो सध्या यूएसमध्ये आहे.
- भारतीय संघ सोमवारी (22 जुलै) दुपारी 1 वाजता चार्टर फ्लाइटनं मुंबईहून कोलंबोसाठी रवाना होईल. तत्पुर्वी 22 जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मीडिया कॉन्फरन्स होऊ शकते. ज्यात नवनियुक्त टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवचाही समावेश असेल.
हेही वाचा :