Most Sixes in T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2024 सुरु होण्यासाठी फक्त 4 दिवस उरलेत. या मेगा-टूर्नामेंटमध्ये भारतीय चाहत्यांना विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माकडून धावांची अपेक्षा असेल. पण त्याआधी आज आम्ही तुम्हाला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप 5 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत. या फलंदाजांमध्ये भारताच्या 2 फलंदाजांच्या नावांचा समावेश आहे.
टॉप 8 मध्ये विराट कोहलीचा समावेश : टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आठव्या क्रमांकावर आहे. त्यानं 27 सामन्यांच्या 25 डावात एकूण 28 षटकार मारलेत. आता टी-20 विश्वचषक 2024 मध्ये विराटला आपली आकडेवारी सुधारण्याची आणि सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवण्याची संधी असेल.
शेन वॉटसन : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 24 सामन्यांच्या 22 डावात 31 षटकार मारले आहेत.
युवराज सिंग : भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. युवराजनं 31 सामन्यांच्या 28 डावात एकूण 33 षटकार मारले आहेत. टी-20 विश्वचषकात 6 चेंडूत 6 षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे.
जोस बटलर : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलर टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात बटलरनं आतापर्यंत 27 सामन्यांच्या 27 डावांमध्ये एकूण 33 षटकार मारले आहेत.
जोस बटलर : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलर टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात बटलरनं आतापर्यंत 27 सामन्यांच्या 27 डावांमध्ये एकूण 33 षटकार मारले आहेत.
ख्रिस गेल : वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्यानं 33 विश्वचषक सामन्यांच्या एकूण 31 डावांमध्ये 63 षटकार मारले आहेत. आतापर्यंत एकाही फलंदाजाला त्याचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडता आलेला नाहीय.
हेही वाचा
महाराष्ट्र प्रिमियर लीगमुळं अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी : रणजी प्लेअर अझीम काझी - IPL 2024
केकेआरनं ट्रॉफी जिंकल्यावर बॉलीवूडमध्ये जल्लोष, करण जोहरसह 'या' स्टार्सनी केलं अभिनंदन - IPL 2024